"पंतप्रधानपदासाठी तुम्हाला पाठिंबा देऊ", गडकरींना कोणी दिली होती ऑफर? स्वतःच केला खुलासा

नितीन गडकरी यांना म्हटलं की, लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्या नेत्याचे नाव सांगणार नाही.

Advertisement
Read Time: 2 mins

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नितीत गडकरी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक स्वभावामुळे चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने संपर्क साधून तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे सांगितले होते. याबाबतचा किस्सा नितीन गडकरी यांना सांगितला. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. 

(नक्की वाचा - VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?)

नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगताना म्हटलं की, लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्या नेत्याचे नाव सांगणार नाही. तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असे त्या नेत्यांने मला म्हटलं होतं. पण मी त्याच क्षणी त्यांचा प्रस्ताव नाकारला. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही मला पाठिंबा का साथ द्याल? आणि मी तुमचा पाठिंबा का स्वीकारू? 

(नक्की वाचा-  पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते आणि दोन मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ, उद्या CM एकनाथ शिंदेंसोबत बैठक)

पंतप्रधानपदाची ऑफर नाकारण्याबद्दल गडकरी यांनी म्हटलं की, पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्यातील उद्दिष्ट नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे. माझे विचार आणि पक्षाप्रती मी एकनिष्ठ आहे. कोणत्याही पदासाठी माझ्या विचारांशी मी तडजोड करणार नाही. हीच गोष्ट लोकशाहीची मजबूत ताकद आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी विश्वासाची भूमिका महत्त्वाची असते, असं नितीन गडकरी म्हणाले.

Topics mentioned in this article