Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष संघटनेतील कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात बोलताना गडकरींनी केलेले हे वक्तव्य उपस्थितांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात 'इन्कमिंग' सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी पक्षातील नेतृत्वाला एक महत्त्वाचा सल्ला आणि थेट इशारा दिला आहे. 'घरकी मुर्गी दाल बराबर' vs 'सावजी चिकन मसाला' नितीन गडकरी यांनी नागपुरी भाषेत पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
ते म्हणाले, "जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर असतो, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असतात." गडकरी यांनी थेट कळमेश्वर-सावनेर भागातील पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे डॉ. राजीव पोतदार यांच्या कामाची आठवण बावनकुळे यांना करून दिली.
(नक्की वाचा- Pune News: मोहोळांची संपत्ती 400 पट वाढली? 'पांढऱ्या इनोव्हाचा उल्लेख करत धंगेकरांचा नवा बॉम्ब, पुण्यात खळबळ)
गडकरींनी मंचावर उपस्थित असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले, "डॉ. पोतदारसारखा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण बावनकुळे त्याकडे लक्ष देत नाहीत. चांगला माणूस हा घरकी मुर्गी दाल बराबर असतो. जुन्या लोकांकडे लक्ष द्या. हे माझ्या काळातले जुने कार्यकर्ते आहेत."
"प्रामाणिक कार्यकर्त्यांची तुम्ही कदर नाही केली, तर पक्षाची जेवढ्या जोराने वाढ सुरू आहे, तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा". नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे., हे लक्षात ठेवा. जुन्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवा". नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.