अदाणी ग्रीन एनर्जींने बुधवारी एक निवेदन जारी करत लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अदाणी कुटुंबियांच्या कोणत्याही सदस्यांवर लाचखोरीचा आरोप नाही, असं अदानी ग्रीन एनर्जींने स्पष्ट केलं आहे. गौतम अदाणी, सागर अदाणी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत कोणतेही आरोप नाहीत.
अमेरिकन न्याय विभागाच्या माहितीनुसार अदाणी कुटुंबियांवर कोणतेही आरोप नाहीत. Azure power चे अधिकारी, एक कॅनेडीयन गुंतवणूकदारावर फक्त आरोप आहेत.
अदाणी समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवरही आरोप नाहीत
अदानी ग्रीन एनर्जीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ Azure पॉवरचे रणजीत गुप्ता, सिरिल कॅबन्स, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल आणि CDPQ (कॅनेडियन संस्थात्मक गुंतवणूकदार) यांच्यावर भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अदानी समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आरोपपत्रात गौतम अदाणी किंवा सागर अदाणींचं नाव नाही- मुकूल रोहतगी
अमेरिकेत लाचखोरी प्रकरणी दाखल झालेल्या चार्टशीटमध्ये पाच आरोप आहेत. यामध्ये अनेकांची नावं आहेत. परंतु या आरोपपत्रात गौतम अदाणी किंवा त्यांचे पुतणे सागर अदाणी यांची नावं नाहीत, असं ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी स्पष्ट केलं आहे. माध्यमांमध्ये अदाणींविरोधात दोन्ही आरोप असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. मात्र दोन्ही आरोपाखाली त्यांची नावं नाहीत. मी अदाणींचा प्रवक्ता नाहीत. मात्र हे माझं वैयक्तिक कायदेशीर मतं आहे. अदाणी ग्रुप कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून यावर उत्तर देईल, असंही मुकुल रोहतगी यांनी सांगितलं.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)