जाहिरात

Akola News : अकोल्यात धावत्या बसमध्ये घडली सर्वात भयंकर घटना, सर्व प्रवाशांमध्ये घबराट, बस गेली थेट रुग्णालयात

 अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून निघालेल्या बुलढाणा आगाराच्या बसमध्ये प्रवासादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.

Akola News : अकोल्यात धावत्या बसमध्ये घडली सर्वात भयंकर घटना, सर्व प्रवाशांमध्ये घबराट, बस गेली थेट रुग्णालयात
Akola Buldhana Bus News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News Today : अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून निघालेल्या बुलढाणा आगाराच्या बसमध्ये प्रवासादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.ही बस अकोल्यावरून मलकापूरच्या दिशेने जात असताना बसमधील एका वृद्ध प्रवाशाला अचानक भोवळ आली आणि ते जागेवरच कोसळले.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.काही प्रवाशांनी तत्काळ त्या वृद्धाला उभे करण्याचा प्रयत्न केला,तर काहींनी मिर्गी आली म्हणून त्याला कांद्याचा नाकापर्यंत श्वास दिला मात्र तो उठलाच नाही.दरम्यान यावेळी बस चालकाला घटनेची माहिती दिली. 

बसमधील प्रवासी आणि कर्मचारी या दोघांनीही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.परंतु वृद्ध व्यक्तीची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थेट अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाकडे वळवली.

चालकाची तत्परता; बस पोहोचली थेट रुग्णालयात

बस चालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे बस काही वेळातच अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या आवारात पोहोचली.बसमधील प्रवाशांच्या मदतीने त्या वृद्धाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.दरम्यान डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सुरू केली.मात्र तपासणीदरम्यानच त्या वृद्धाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. काळपांडे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. 

नक्की वाचा >> Pune News: बोगद्याला मोठं छिद्र! पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता 'रूट मार्कर' बसणार, नागरिकांनाही..

मृत व्यक्तीचे नाव एकनाथ तात्या पवार असून त्यांचे वय अंदाजे 90 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे बसमधील प्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अनेक प्रवाशांनी कंडक्टर शुभांगी दौंड आणि चालकाच्या तत्परतेचे कौतुकही केले,कारण प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्याने तातडीने बस रुग्णालयाकडे नेली होती.

वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?

या घटनेमुळे बसमधील प्रवासी काही काळ स्तब्ध झाले होते.अचानकपणे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.काही प्रवासी भीतीमुळे घाबरले होते,तर काही जणांनी त्या वृद्धासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रुग्णालय प्रशासनालाही या घटनेची माहिती मिळताच आवश्यक कार्यवाही करण्यात आली.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अधिकृतरीत्या त्या वृद्धाला मृत घोषित केले.या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तसेच बसमधील प्रवाशांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान,वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत पुढील वैद्यकीय प्रक्रिया आणि नोंदी करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com