राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. पुणे,नागपूर, मुंबई नंतर पुन्हा एकदा नागपूरात हिट अँड रनची घटना घडली आहे. यात एका सहा वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. नागपूरच्या मॉडेल मिल चाळी समोर ही दुर्घटना घडली. एका भरधाव बसनं या चिमुरडीला चिरडलं. त्यात तिचा मृत्यू झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूरच्या मॉडेल मिल चाळी समोर आज गुरूवारी दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बसच्या चाकाखाली येऊन एका सहा वर्षीय मुलीचा करूण अंत झाला आहे. आराध्या धीरज नागदिवे असं या चिमुरडीचं नाव आहे. या चिमुरडीचे कुटुंब पंजाब येथील आहे. तिचे नातेवाईक नागपूरात राहतात. मॉडेल मिल चाळीत तिचा मामा राहतो. त्याच्या लग्नाला ही चिमुरडी नागपूरात आली होती.
घरात लग्नाची तयारी सुरू होती. घरातले सर्व जण लग्नाच्या गडबडीत होते. त्यावेळी आराध्याही घराच्या बाहेर खेळत होती. त्या वेळी खेळता खेळता ती धावत रस्त्यावर आली. त्यावेळी समोरू आलेल्या बसने तिला उडवले. त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला. बस चालक सुरेश पारधी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - फेसबुकवर ओळख, पोलिस असल्याची बतावणी अन् 13 लाखांना चुना
अपघात झाला तेव्हा जोरदार आवाज झाला. असं प्रत्यक्षदर्शी असलेल्या सुनिता नागसेन पाटील यांनी सांगितले. त्या म्हणतात आम्ही आवाज ऐकून बाहेर आलो. तर मुलीला चिरडून बस पुढे गेली होती. काही तरुण बसच्या मागे धावले आणि त्यानी बस थांबवली.आम्ही धावत जाऊन तिच्या कुटुंबीयांना सांगितले. तो पर्यंत चिमुरडीचा जिव गेला होता असे त्या म्हणाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world