देवा राखुंडे, प्रतिनिधी
Indapur Onkar Cycling Viral Video : पुण्याच्या इंदापूर मध्ये ओंकार बापू जगताप या तरुणाने सायकलवरून तब्बल चार हजार किलोमीटर हून अधिकचा प्रवास केला.29 मार्चला तो इंदापूरहून निघाला होता. आतापर्यंत त्याने सायकलवरून चार हजार किलोमीटरचा प्रवास करत त्र्यंबकेश्वर,सोरटी सोमनाथ,द्वारका,नागेश्वर,हरिद्वार मार्गे केदारनाथ अशी यात्रा पूर्ण केली आहे.मूळचा इंदापूरचा असणारा ओंकार जगताप इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवनाशेजारी राहतो.ओंकारची घरची परिस्थिती सामान्यच..अशातच त्याने सायकलने प्रवास करून केदारनाथचं दर्शन करायचा ठाम निर्धार केला.
2019 साली ओंकार ने सायकलवरून प्रवास करीत भीमाशंकर,घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर गाठलं होतं.विशेष म्हणजे एवढा मोठा टप्पा फोटोग्राफर स्वप्निल शिंदे या मित्राच्या सायकलवरून त्याने पार केला होता. मागील सात वर्षांपूर्वी पहिला टप्पा सायकल वरून पूर्ण झाल्यानंतर आता 2026ला प्रवासाचा दुसरा टप्पा आखला.यामध्ये त्याने सायकलवरून इंदापूर ते केदारनाथ आणि चारधाम असा प्रवास करायचं ठरवलं.तारीख वेळ निश्चित करण्यात आली.त्यासाठी 16000 रुपये किमतीची एक नवीन सायकल देखील त्यानं पुण्यावरून खरेदी केली आणि 29 मार्चला तो या प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
नक्की वाचा >> Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."
असा होता प्रवासाचा टप्पा
प्रतिवर्षी कामदा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी इंदापूर शहरातील मानाच्या असणाऱ्या कावडी शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या पिंडीला धार घालण्यासाठी जात असतात.यावर्षी देखील इंदापूर शहरातील एक असणारा उत्तेकर बंधू यांचा कावड सोहळा शिखर शिंगणापूरसाठी रवाना झाला.त्या कावडी सोबतच ओंकारने आपलंही सायकलवरून प्रस्थान ठेवलं.त्याने थेट सायकलवरून शिखर शिंगणापूर गाठलं.शिखर शिंगणापूर मध्ये खांद्यावर कावड नाचवून शंभू महादेवाचे दर्शन घेत ओंकर जगताप याने आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.
— Naresh Shende (@NareshShen87640) May 17, 2026
ओंकार गंगोत्रीच्या प्रवासासाठी मार्गस्थ
केदारनाथ आणि चारधाम यात्रा सायकलवरून पूर्ण करायची असा पण ओंकारने केला होता.या प्रवासादरम्यान वाटेत हरिश्चंद्रगड,त्र्यंबकेश्वर,सोरटी सोमनाथ,द्वारका,नागेश्वर,हरिद्वार,ऋषिकेश मार्गे केदारनाथ अशी यात्रा पूर्ण केली.यानंतर या प्रवासादरम्यान भारतातील सर्वोच्च शिखरावर असलेल्या उत्तराखंड राज्यातील तुंगनाथ मंदिरात जाऊन देखील ओंकारने दर्शन घेतला आहे.यानंतर बद्रीनाथ दर्शन घेऊन सध्या तो गंगोत्री या ठिकाणच्या प्रवासासाठी मार्गस्थ आहे. यानंतर पुढे तो यमुनेत्री काशी दर्शन करून तो पुन्हा मातृभूमीत परतणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world