Cidco House News : 'याच' नागरिकांना सिडकोचं घर निवडण्याची आणि बुकिंगची संधी, काय आहे नवा नियम?

सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 20 हजारांहून अधिक नोंदणी झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Cidco House Registration And Booking
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Cidco House Ragistration Latest News : सिडकोच्या नव्या गृहनिर्माण योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल 20 हजारांहून अधिक नोंदणी झाल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सिडकोच्या घरांसाठी 21 डिसेंबरपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. महत्त्वाचं म्हणजे पात्र उमेदवारांनाच घर निवडण्याची संधी आहे.

सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार,21 डिसेंबर 2025 पर्यंत ज्यांनी आपले अर्ज (Application) सबमिट केले आहेत आणि ज्यांची पात्रता (Eligibility) पूर्ण आहे, त्यांनाच घर निवडण्याची आणि बुकिंगची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत इच्छुक नागरिकांनी नोंदणी अर्ज भरणे आणि पात्रता प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.पात्रतेची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच नागरिकांना घर निवडता येणार आहे आणि पेमेंट करता येणार आहे. 

28 डिसेंबर सकाळी 11 वाजता बुकिंग विंडो उघडणार

सिडकोने जाहीर केले आहे की, 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता घर निवड आणि बुकिंगची विंडो उघडणार आहे. पात्र उमेदवारांना या दिवशी उपलब्ध घरांच्या यादीतून थेट निवड करून ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.यासाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पेमेंट रेडी ठेवण्याचं आवाहन सिडकोकडून करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> 3 दिवसात 10000000 कमावले! एका फोनमुळं 'या' महिलेचं नशिबच चमकलं, तुम्ही विचारही करू शकत नाही

नोंदणीसाठी नागरिकांचा वाढता उत्साह

नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात असून सिडकोच्या विश्वसनीयतेमुळे नागरिक या योजनेकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः 20  हजारांहून अधिक नोंदणी ही योजनेवरील विश्वास दाखवणारी सकारात्मक बाब मानली जात आहे.इच्छुकांनी उशीर न करता नोंदणी व अर्ज प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करून पात्रतेची खात्री करून घ्यावी, जेणेकरून घर निवडताना अडचणी येणार नाहीत,अशी सूचनाही सिडकोकडून देण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> 200 कोटी नाकारले! नागा चैतन्यसोबत का घेतला समंथा रुथ प्रभुने घटस्फोट? 'हे' कारण अनेकांना माहितच नाही

Topics mentioned in this article