जाहिरात

3 दिवसात 10000000 कमावले! एका फोनमुळं 'या' महिलेचं नशिबच चमकलं, तुम्ही विचारही करू शकत नाही

कधी कधी आयुष्याच्या वळणावर अचानक अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे आपल्याला सु:खद धक्का बसतो. एका महिलेनं तीन दिवसात एक कोटी रुपये कसे कमावले? वाचा इनसाईड स्टोरी.

3 दिवसात 10000000 कमावले! एका फोनमुळं 'या' महिलेचं नशिबच चमकलं, तुम्ही विचारही करू शकत नाही
Cat Goetze Viral News
मुंबई:

Bluetooth Landline Handset Viral News : कधी कधी आयुष्याच्या वळणावर अचानक अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे आपल्याला सु:खद धक्का बसतो. जीवनाच्या प्रवासात येणारा छोटासा थकवाही मोठा बदल घडवतो. कॅट गोएट्झी (Cat Goetze) यांच्या बाबतीतही असच काहीसं घडलं आहे.सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स,वाढलेलं स्क्रीन टाइम आणि एक विचित्र अस्वस्थता..तिला वाटलं की जसं मोबाइलचं जग पुढे जातंय, तसं आयुष्यातील साधेपणाही हळूहळू नष्ट होतंय. याच विचारांनी तिला जुन्या आठवणींकडे नेलं..जेव्हा लंडलाइनची घंटी होती, तारांचे जाळे होते आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या जात होत्या.

कॅट (Cat) ज्यांना इंटरनेटवर लोक CatGPT म्हणूनही ओळखतात, त्या सीएनबीसी (CNBC) सोबत संवाद साधताना म्हणतात की, "मी फक्त विचार करत होते की लँडलाइन परत आलं तर किती आनंद होईल. कॉर्ड फिरवत गप्पा मारण्याचा तो काळ किती छान होता. पण जेव्हा खरं लँडलाईन घेण्याचं समजलं,नवीन नंबर, पेड कनेक्शन…तेव्हा मी ठरवलं. हे स्वत:च करायचंय. तिने एका थ्रिफ्ट स्टोअरमधून जुना गुलाबी क्लॅमशेल हँडसेट विकत घेतला,त्याला ब्लूटूथ-कंपॅटिबल बनवलं आणि हेच तिचं छोटंसं प्रयोग बनलं.हा फोन लवकरच तिच्या अपार्टमेंटमधला सर्वात युनिक, सर्वात स्टायलिश गॅजेट ठरला.

नक्की वाचा >> सुधीर मुनगंटीवारांचं टेन्शन वाढलं? 'या' उमेदवारांसाठी भाजपच्या विरोधात गौतमी पाटील मैदानात, Video व्हायरल

या फोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि नंतर..

कॅटने जुलै 2025 मध्ये या फोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि नंतर असं काही घडलं,ज्यामुळे तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो कमेंट्स, हजारो व्ह्यूज आणि लोकांची एकच मागणी होती "आम्हालाही हवाय!" कॅटने तिच्या प्रकल्पाचं नाव फिजिकल फोन्स (Physical Phones) असं ठेवलं आणि एक ऑनलाईन स्टोअर सुरु केलं.त्यानंतर फक्त 3 दिवसात जवळपास $120,000 (1 कोटी) रुपयांची विक्री झाली.ऑक्टोबर 2025 पर्यंत 3,000+ युनिट्स विकल्या गेल्या आणि एकूण महसूल $280,000 पार गेला. Cat ने या अनुभवाबद्दल सांगितलं, "असं वाटलं जणू बाटलीत वीज कैद केली आहे."

ब्लूटूथद्वारे iPhone आणि Android दोन्हीशी कनेक्ट

WhatsApp, FaceTime, Instagram, Snapchat – सगळ्यांच्या कॉलवर रेट्रो बेल वाजते.
डायल करून आउटगोइंग कॉल्स करता येतात.
बटण दाबताच व्हॉइस असिस्टंट सुरू होतो.
५ हँडसेट मॉडेल्स, किंमत $90–$110.
पहिला बॅच डिसेंबरपासून शिपही झाला आहे.

नक्की वाचा >> 200 कोटी नाकारले! नागा चैतन्यसोबत का घेतला समंथा रुथ प्रभुने घटस्फोट? 'हे' कारण अनेकांना माहितच नाही

लोक हे रेट्रो फोन का विकत घेत आहेत? 

Cat च्या मते, आज लोक डिजिटल ओव्हरलोडपासून सुटका मिळवण्यासाठी मार्ग शोधत आहेत. महामारीनंतर लोकांची एकाग्रता कमी झाली, चिंताग्रस्तता वाढली आणि एकटेपणा अधिक गडद झाला. त्यामुळे लोक अशा डिव्हाइसच्या शोधात आहेत जे त्यांना स्क्रीनपासून ब्रेक देईल, पण कनेक्टेडही ठेवेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com