Operation Sindoor : 'ते काय म्हणतात त्याला...' मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं राज ठाकरेंना उत्तर

ऑपरेशन सिंदूरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली होती. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून चोख उत्तर दिलं आहे. भारतीय वायूसेनेनं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची भावना आहे. पण, त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली होती. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितलं की,  पाकिस्तानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचे सर्व दहशतवादी अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्करानं केलं आहे. पाकिस्तानच्या आतल्या भागामध्ये जाऊनही हे अड्डे नष्ट करण्याचं काम आपल्या लष्करानं केलं आहे.

हा नवीन भारत अशा प्रकारे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे. भारताने गेल्या 14 दिवसात सगळ्या देशाची संपर्क करून पाकिस्तान कसा दोषी आहे ते सांगितले .त्याची माहिती दिली. त्यामुळे विविध देश आपल्या पाठीशी आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.

( नक्की वाचा : Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' चे हनुमानाशी कनेक्शन! संरक्षणमंत्र्यांनी समजावून सांगितला अर्थ )

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की,  ते काय म्हणतायत यााला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतोय. संपूर्ण जग भारताच्या पाठिशी उभं आहे.

Advertisement

काय म्हणाले होते ठाकरे?

पहलगाम हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवला पाहिजे, असे मी म्हटले होते. मात्र दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध असू शकत नाही. युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रील आणि सायरन वाजवायचे. मुळात हे का घडलं? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतके पर्यटक असताना तिथे सुरक्षा का नव्हती हे महत्त्वाचे आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.  

आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून यांना हुडकून काढणे गरजेचे आहे. एअर स्ट्राईक करून, लोकांना भरकटवून, हा काही पर्याय अथवा उत्तर होऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूर नाव देता हे महत्त्वाचे नाही. नावाने कुणी भावनिक होत नाही.  तुम्ही काय पाऊले उचलता ते महत्त्वाचे आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

Advertisement
Topics mentioned in this article