Exclusive: देशाची जनता पुरावे मागते, यापेक्षा ट्रॅजेडी काय? Operation Sindoor जवळून पाहिलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्याचा सवाल

लेफ्टनंट जनरल(रि.) विनोद खंदारे यांनी NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की भारताने उचललेले प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारीपणे आणि काटेकोर नियोजनानंतरच उचलले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Pahalgam Terror Attack : पहलगाम इथे धर्म विचारून निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता. यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशताद्यांचे अड्ढे उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई हल्ला केला. आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे जात काही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.   यामुळे पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्यांना सुरुवात केली, ज्याचा बीमोड करत भारताने हल्ल्यांची तीव्रता वाढवत पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले होते. ही सगळी कारवाई जवळून पाहणारे लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे हे नुकतेच निवृत्त झाले. ऑपरेशन सिंदूरमागच्या काही थरारक घटना त्यांनी उलगडून सांगितल्या. यामध्ये त्यांनी सांगितले की भारताने आणखीही दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याची योजना आखली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

थांबा... म्हणून फोन आला!  

लेफ्टनंट जनरल(रि.) विनोद खंदारे यांनी NDTV मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले की भारताने उचललेले प्रत्येक पाऊल हे अत्यंत विचारीपणे आणि काटेकोर नियोजनानंतरच उचलले होते. त्यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचा तणाव अथवा युद्ध असो दोन देशांमध्ये हॉटलाइनवरून संपर्क साधला जातो. भारताने जेव्हा दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तेव्हाही त्यांना हॉटलाइनवरून हे कळवण्यात आलं होतं. उरी, बालाकोट कारवाईच्या वेळीही पाकिस्तानला संदेश पोहचवण्यात आला होता. भारताने हे अड्डे रात्रीचा वेळी उद्ध्वस्त केले, कारण त्यावेळी सामान्य नागरीक झोपलेले असतात आणि भारताचा मुख्य उद्देश दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे हा होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. याबद्दल पाकिस्तानकडून हॉटलाइनवरून काहीही कळवण्यात आलं नव्हतं.  ज्यानंतर भारताने पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आणि त्यांनी हॉटलाइनवरून भारताची रात्री 3.35 वाजता संपर्क साधला. पाकिस्तानी डीजीएमओ 'थांबा...' बोलले आणि पुढे शस्त्रबंदी झाली असे खंदारे यांनी सांगितले. 

Advertisement

(नक्की वाचा-  Jyoti Malhotra: 'माझं लग्न पाकिस्तानात...', गुप्तहेर ज्योती अन् ISI ऐजंट अलीचं वॉट्सअप चॅट आलं समोर)

पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली

दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे, त्यांची कार्यायलये आंतरराष्ट्रीय सीमेपलिकडे पाकिस्तानात आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी भारतीय सैन्य पाकिस्तानात शिरेल आणि युद्ध होईल असे पाकिस्तानला वाटले होते, मात्र भारताने सीमा न ओलांडता हल्ले केले. यानंतर पाकिस्तानच्या लष्कराचे अड्डेही उद्ध्वस्त केले, ज्यामुळे पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आणि त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

(नक्की वाचा- Crime News: 25 खोटी लग्न, 25 तरुणांची फसवणूक, पोलिसांनी असा डाव टाकला की 'लुटेरी दुल्हन'चा खेळ खल्लास)

राजकारण करणाऱ्यांना सुनावले खडे बोल

खंदारे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, किती लोकं मारले गेले? आणि लोकं मारल्याचा पुरावा काय? असे प्रश्न विचारले जातात. माझ्या देशातील लोकं मला पुरावे मागत असतील तर यापेक्षा मोठी ट्रॅजेडी अथवा कॉमेडी होऊ शकत नाही. तुम्हाला राजकीय फायदा उचलायचा तर उचला पण आमच्या लढाईत मध्ये येऊ नका. आम्ही तुम्हाला विचारत नाही कसं लढायचं, आम्हाला लढाई लढता येते.आम्ही प्रोफेशनल आहोत.
 

Advertisement

Topics mentioned in this article