Palghar School Holiday: पालघरमध्ये मुसळधार पाऊस! या 3 जिल्हांतील शाळा-महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Palghar School Holiday: पालघर जिल्ह्यात सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 24 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आज, शुक्रवार 24 जुलै रोजी जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोणकोणत्या शैक्षणिक संस्थांना असेल सुट्टी?

  • सर्व अंगणवाड्या
  • सरकारी व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा
  • जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा
  • अनुदानित व विनाअनुदानित शाळा
  • सर्व आश्रमशाळा
  • सर्व महाविद्यालये
  • आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आदेश

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पालघर, डहाणू आणि तलासरी भागात नद्या, नाले आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच नदीपात्र किंवा पूरप्रवण भागाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 


Topics mentioned in this article