Palghar News : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला उद्या २३ जुलै रोजी हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. अतिवृष्टी झाल्यास शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हानं उभी राहू शकतात. या अनुषंगाने डहाणू आणि तलासरी तालुक्यात उद्या शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघरमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शाळा-महाविद्यालयं आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गुजरात-महाराष्ट्र सीमेवर अनेक घरात पुराचं पाणी...
दुसरीकडे गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावरील झाई गावात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. यामुळे अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर त्याचा मोठा परिणाम समुद्र किनाऱ्यावरील गावांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.