
देवा राखुंडे
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी मधील शाहीस्नान सोहळा आज नीरा नदीमध्ये पार पडला आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर आज हा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी थांबला होता. विश्रांती नंतर हा सोहळा दुपारी एक वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदीवर असलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा हा लवाजमा स्नानासाठी चालला होता. पुलावरील ते विहंगमय दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी वारकरी आणि माऊली भक्तांची मोठी गर्दी जमा झाली होती. हे दृष्य डोळ्यात साठवणे हे एक पर्वणीच मानली जाते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्या नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या. ज्या वेळी या पादुका घाटावर घेवून जाण्यात येत होत्या त्यावेळी माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू झाला. मंगलमय भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. यावेळी नदी काठी आणी घाटावर भाविकांची तुडुंब गर्दी जमली होती. हा क्षण प्रत्येकाला आपल्या डोळ्यात साठवायचा होता.

होणारी गर्दी ही प्रशासनाला आपेक्षित होती. शिवाय नीरा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी होते. या भागात पाऊस झाल्या मुळे नीरा नदी दुथडी वाहात होती. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली होती. यानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर हा सोहळा हैबतबाबाचे जन्मस्थळ असलेला सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा सोहळा हा लोणंद मध्ये मुक्कामी असणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने निघाली आहे. माऊलींची पालखी आळंदीहून मार्गस्थ झाली आहे. ती पुणे, दिवे घाट, जेजूरी पार करत पुढे सरकली आहे. आषाढी वारी पर्यंत ही पालखी पंढरपुरात दाखल होईल. द्या मार्गावरून ही पालखी जात आहे त्या ठिकाणी भावीक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. जेजूरीमध्ये ही तोच अनुभव आला. पालीखीचं आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक एकत्र आले होते. आता नीरा स्नानानंतर पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 (Saint Dnyaneshwar Mauli Palkhi Route )
- 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
- 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी
- 21/06/2025 पुणे मुक्काम
- 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
- 23/06/2025 सासवड मुक्काम
- 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
- 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
- 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
- माऊलींना निरास्मान
- 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी
- 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी
- 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी
- 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी
- बरड येथे गोल रिंगण
- 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी
- सदाशिवनगर येथे गोल रिंगण
- 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी
- खुडूस येथे गोळ रिंगण
- 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी
- ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
- 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
- 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे गोल रिंगण
- 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
- 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world