जाहिरात
3 hours ago

Ashadhi Ekadashi Live Updates 2025: गेल्या महिनाभरापासुन विठुनामाचा गजर करत विठ्ठल भेटीला निघालेल्या वारकऱ्यांचे पंढरपुरनगरीमध्ये आगमन झालं आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांचा महापूर लोटला असून विठ्ठल नामाच्या गजराने, वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपुर नगरी दुमदुमून गेली आहे. चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा अलोट संगम पाहायला मिळत आहे. आज पहाटेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. 

Ashadhi Ekadashi Live: आषाढी एकादशीनिमित्त संत नामदेवाच्या जन्मस्थळी भाविकांची मांदियाळी

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे आज आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.. आज सकाळी शासकीय महापूजा पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.. तर संत नामदेव महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी पाहायला मिळाली आहे..

Ashadhi Ekadashi Live Update: संभाजीनगरच्या प्रति पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी

ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाणे शक्य होत नसते असे शेतकरी वारकरी हे विठू नामाचा गजर करत आषाढी एकादशीला संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपुरामध्ये दर्शनासाठी येत असतात. पहाटेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरपूर वाळूज येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संपूर्ण  कुटुंबासह महापूजा करत दर्शन घेतले. आज दिवसभर पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Ashadhi Ekadashi Live: आषाढी एकादशीनिमित्त संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथे संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी 

पहाटेपासुन दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहिला मिळाले.

मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचे पाहिला मिळाले

भानुदास एकनाथांचा जयघोषाने मंदिर परिसर दणाणुन गेला

एकादशीनिमित्त नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरस करण्यात आली.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूर विशेष रेल्वे

आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूर विशेष रेल्वे सोडण्यात आली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा करते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ह्या विशेष रेल्वेचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या विशेष रेल्वेने खानदेश विदर्भ व मध्य प्रदेशातील हजारो वारकरी हे आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान भजन कीर्तनात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागली असून पंढरपूर कडे जात असताना मोठा उत्साह वारकरी व भाविकांमध्ये पाहायला मिळा

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची पालखी दिंडी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील  शाळांमध्ये राज्याचे प्रतीक असलेल्या पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आषाढी पालखी दिंडी काढत रिंगण सोहळा साजरा केला. 

कडा शहरांमधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रथामधून विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पालखी दिंडी काढली. या पालखीमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगासह संविधानाचे प्रतही ठेवण्यात आली होती. 

रथातील पालखी दिंडीचे पूजन करण्यात आल्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्यांचा आनंद लुटला. त्यानंतर ही पालखी दिंडी ची गावातून प्रदक्षिणा काढण्यात आले.

Ashadhi Ekadashi Live Updates: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात आज विठोबाच्या शासकीय महापुजेने झाली. पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या वारकऱ्या सोबत विठ्ठलाची महापूजा केली. अन आषाढीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. विठ्ठलाच्या शासकीय महापूजा नंतर NDTV मराठीच्या प्रेक्षकांना घरबसल्या विठ्ठल गाभाऱ्यातून दर्शन घडवत आहेत.

Ashadhi Ekadashi Live Updates: विठ्ठलाच्या महापूजा नंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्यात तसेच मंदिराला आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे यामध्ये झेंडू शेवंती जरबेरा मोगरा जाई तुळस आणि पाने अशा फुलांचा वापर करत तर सफरचंद डाळिंब पेरू चिकू संत्रा अशा फळांचा वापर करत मंदिर सजवण्यात आले आहे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आणि इतर परिसर देखील फुलांनी सजला आहे. 

Ashadhi Ekadashi Live: जांभळाच्या फळावर साकारली विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा

आषाढी एकादशीचे  औचित्य साधून नाशिकच्या चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी चक्क जांभळाच्या फळावर अक्रेलिक रंग वापरून विठ्ठलाची सुंदर प्रतिमा साकारत  निसर्ग आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवत.आगळ्या वेगळ्या विठ्ठल भक्तीचा आविष्कार साकारताना विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतांना, एक तरी जांभळाचं झाड  लावावं हाच संदेश या चित्रामधून विठ्ठलभक्तांनी दिलाय .

Ashadhi Ekadashi Live Updates: पाण्याखाली साकारली विठुरायाची रांगोळी

रत्नगिरीतल्या देवरुख येथील रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी आषाढी एकादशी निमीत्त अनोख्या पद्धतीने श्री विठ्ठलाप्रति भक्तीभाव व्यक्त केला आहे. रहाटे यांनी पाण्याखाली श्री विठूरायची रांगोळी साकारली आहे. जुन्या पितळेच्या परातीत पाणी घेत या पाण्यात त्यांनी विठुरायाची रांगोळी साकारली आहे. एका तासात त्यांनी ही विठुरायाची रांगोळी साकारली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी मोरपीसावर, तुळशीपत्रावर, सुपारीवर श्री विठ्ठलाचं रूप साकारलं आहे..

Ashadhi Ekadashi 2025: पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी

आषाढी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली. अन पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकरी भक्तांच्या भक्तांचा महापूर आलेला दिसून येतो आहे. प्रत्येक भाविक हा मुखी विठ्ठल विठ्ठल नाव घेत चंद्रभागेच्या तीरावरवरून एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com