शिक्षणाच्या शोधात अनेक पालक आपली मुलं परदेशातील प्रतिष्ठित शाळांमध्ये घालतात. मात्र, परदेशात स्थायिक असूनही आपल्या मुलाला मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून भारतात परत येण्याचे पाऊल कुणी उचलत नाहीत. त्यातच एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका पालकांनी असं पाऊल उचललं आहे. आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या शेळके कुटुंबीयांनी आपला मुलगा विहान याला थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये दाखल केलं आहे.
विहान याचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती हे दोघंही सध्या न्यूयॉर्कमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. विहान याचं शिक्षण उत्तर कॅरोलिनाच्या शार्लोट येथील हॉक रिज प्राथमिक शाळेत सुरू झालं होतं. मात्र, मराठी भाषेशी त्याचं व शिक्षणाशी घट्ट नातं तयार व्हावं, मातीत रुजलेली मूल्यं आत्मसात व्हावीत, या उद्देशाने पालकांनी विहानचं शिक्षण काही काळासाठी भारतातच, तेही मराठी माध्यमातून करायचा असा निर्णय घेतला.
नक्की वाचा - Amravati News: कमी पटसंख्येचा फटका! अमरावती जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना लागलं टाळं
त्यामुळे विहानला त्याचे मामा डॉ. उमेश बालटे यांच्या गावी, म्हणजेच आटपाडीत आणण्यात आलं. सांगोला हे शेळके कुटुंबाचं मूळ गाव असलं तरी आजोळ आटपाडी असल्याने जिल्हा परिषदशाळा क्रमांक १ ची निवड त्याच्यासाठी करण्यात आली. सोमवारी विहानसह इतर विद्यार्थ्यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आलं. विहानला मराठी बोलता येत नाही. त्याचा संभाळ करत असतानाही अनेक अडचणी येत असल्याने व आपल्या मातीशी मुलाची नाळ जोडली जावी म्हणून त्यांच्या आईवडिलांनी विहानचा प्रवेश आटपाडी येथील मराठी शाळेत घेतल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. त्याला शैक्षणिक मराठी वाचता लिहिता येत नाही. पण घरात थोडं फार मराठी बोलतो.
आटपाडी जिल्हा परिषद आमच्या शाळेत विहानच्या आई आणि वडिलांनी विहानला शाळेत घातले आहे. हे कौतुकास्पद आहे. आमच्या शाळेत विहान च्या मामाच्या दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्याची तयारी आणि शिक्षण पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. असे शिक्षक सांगतात.
जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक...
विहान विजयकुमार शेळके या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे.. त्याचे व त्याच्या आई-वडिलांचे कौतुक व स्वागत सांगली जिल्हा परिषद मुख्याधिकारी तृप्ती धोडमसे यांनी केले आहे. त्याचे आई-वडील हे अमेरिकेमध्ये निवारण तिथे सेटल झालेले आहेत परंतु मुलाला मातृभाषेची मुलाची कायम राहावी आणि मुलाला मात्र तसेच अनेकज्ञान असावं या हेतूने त्याच्या पालकांनी आटपाडीच्या शाळेमध्ये प्रवेश केला घेतला त्याच त्यांनी पेक्षा जास्त की जिल्हा परिषदेच्या शाळेवरती त्यांनी विश्वास दाखवला कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि एक नाळ जोडायचं काम जे आपल्या मराठी शाळा करतात त्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच आम्ही सार्थ करू आणि नक्कीच एक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांवरचा विश्वास वाढण्यासाठी या उदाहरणाच्या नक्की मदत करेल की जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा सरकारी इतर संस्था पूर्ण शिक्षण दिले जाते.. जिल्हा परिषद शाळेत मिरीट मधील शिक्षक आहेत विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आमच्याकडे आलेले आहेत. पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये विश्वास दाखवावा आणि जिल्हा परिषद परिषदेच्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश घ्याव असे आवाहन कार्यकारी मुख्याधिकारी दोडमसी यांनी केले आहे.