Sangli News: येरळा नदीत 8 मुलं बुडाली..नदीकाठावर असलेले पालकही पाण्यात उतरले, पण शेवट झाला सर्वात भयंकर 

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली. पण नंतर असं काही घडलं..

जाहिरात
Read Time: 2 mins
Sangli Yerala River Water Drowning News

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Yerala River Drowning Case : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली. परंतु,नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी आणि इतर लोकांनी तातडीनं पाण्यात बुडालेल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या रेस्क्यू दरम्यान सात जणांचा जीव वाचला. पण एका पालकाला पोहता येत नसल्याचं नदीकाठावर असलेल्या त्यांच्या मुलीनं पाहिलं. फिरदोस जाकीर शिकलगार ही तरुणी वडिलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरली.पण दुर्देवाने फिरदोस पाण्यात बुडाली आणि तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेली फिरदोस कोरेगाव येथील रहिवासी होती. ती सध्या मुंबईत वास्तव्यास होती. भाळवणी येथे शिकलगार मळ्यामध्ये लग्न समारंभासाठी मुंबई तसेच बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते. मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम सुरू असताना काही जण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये 8 ते 10 लहान मुले व मुली होती. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही होते.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: चाकणमधील 'त्या' भयंकर घटनेचा पर्दाफाश, पोलिसांनी 550 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, अखेर..

मुले पाण्यात खेळत होती, पण नंतर असं काही घडलं..

मुले पाण्यात खेळत होती, तर त्यांचे पालक नदी काठावर होते.परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली.यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये उतरून मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.यावेळी पालकांना सात मुलांना वाचवण्यात यश आले.

नक्की वाचा >> Ratnagiri News दिल्लीतील सज्जाद अहमद खानची 50 लाखांची फसवणूक, परदेशातून 50 जण भारतात परतले, 2 भावांचं कांड उघड

पालक पाण्यात बुडाल्याचं मुलीनं पाहिलं अन्..

ज्या पालकांना पोहता येत नव्हते, ते सुद्धा नदीच्या पाण्यात उतरले. यावेळी एक पालक पाण्यात बुडाले असता त्यांची मुलगी फिरदोस त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरली.परंतु, दुर्दैवाने फिरदोस पाण्यामध्ये  बुडाली. सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अस्वस्थ होते. त्यांना विट्याला खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केले. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.