जाहिरात

Pune News: चाकणमधील 'त्या' भयंकर घटनेचा पर्दाफाश, पोलिसांनी 550 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, अखेर..

चाकण बाजारपेठेतील श्री खिमत ज्वेलर्स या दुकानावर गॅस कटरच्या साहाय्याने दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट-3 ने पर्दाफाश केला आहे.

Pune News: चाकणमधील 'त्या' भयंकर घटनेचा पर्दाफाश, पोलिसांनी 550 किमीपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, अखेर..
Pune Chakan Robbery Case Latest Update
पुणे:

 सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pune Chakan Robbery Case Update : चाकण बाजारपेठेतील श्री खिमत ज्वेलर्स या दुकानावर गॅस कटरच्या साहाय्याने दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट-3 ने पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी राजस्थान आणि गुजरात येथील 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 30 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिम्मतकुमार साळवी, मुकेश साळवी, राधेशाम साळवी आणि पुखराज लौहार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

77 लाख 22 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरली

याबाबत सविस्तर वृत्त असं की,22 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास चाकण येथील श्री खिमत ज्वेलर्सचे शटर आणि लोखंडी ग्रील गॅस कटरने तोडून अज्ञात चोरट्यांनी 77 लाख 22 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरली होती.याप्रकरणी भरत सुमेरमल वंजारा यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.तांत्रिक तपास आणि तब्बल 550 किमी पर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयित कार गुजरातच्या दिशेने गेल्याचे उघड झाले. त्याआधारे पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधून हिम्मतकुमार साळवी, मुकेश साळवी,राधेशाम साळवी आणि पुखराज लौहार या चौघांना ताब्यात घेतले. 

नक्की वाचा >> Ratnagiri News दिल्लीतील सज्जाद अहमद खानची 50 लाखांची फसवणूक, परदेशातून 50 जण भारतात परतले, 2 भावांचं कांड उघड

अन्य दोन आरोपी अद्यापही फरार

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.धक्कादायक बाब म्हणजे,दुकानात काम करणाऱ्या किशन रामलाल सोनी या व्यक्तीने चोरी करण्यासाठी आरोपींना चावी दिली होती आणि संपूर्ण माहिती पुरवली होती.या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.या गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार किंमत 3 लाख रु,2.900 किलो बेन्टेक्स दागिने ,17.800 किलो चांदीचे दागिने आणि मूर्ती अंदाजे किंमत 27 लाख रु.असा 30,20,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नक्की वाचा >> Pune News: अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट, नसरापूरमध्ये चिमुकलीसोबत काय काय घडलं? 22 तासांचा घटनाक्रम समोर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com