Pune News : पुण्यातील अनेक नागरिक गरवारे पुलाखाली उतरले, त्याचवेळी मुठा नदीला आला पूर, पुढे असं काही घडलं..

पुण्यातील खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Mutha River Flood News
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Mutha River Flood News :  पुण्यातील खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेकडून वारंवार इशारे देऊनही अनेक नागरिकांनी गरवारे पुलाखाली मुठा नदीपात्रात उतरून स्वतःचा जीव धोक्यात घातला.मात्र,अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत मोठी दुर्घटना टाळली.

मुठा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली

खडकवासला धरण साखळीतून सुरू असलेल्या मोठ्या पाण्याच्या विसर्गामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीला पूरसदृश स्वरूप आले आहे.धोका लक्षात घेऊन जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेने नागरिकांना नदीपात्रात न उतरता सुरक्षित अंतर राखण्याचे वारंवार आवाहन केले होते.मात्र,या सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेक नागरिक नदीपात्रात उतरले.काही जण सेल्फी काढण्यासाठी,तर काही जण दुचाकी घेऊन नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करताना पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकले.

Advertisement

नक्की वाचा >> दाऊद इब्राहिमला घरात घुसून मारण्याचा अजित डोवाल यांचा प्लॅन कुणामुळे फसला? वाचा Inside Story

नदीपात्रात न उतरण्याचे नागरिकांना आवाहन

माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लाईफ जॅकेट,लाईफ रिंग आणि दोरीच्या साहाय्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.जवानांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली.प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना नदीपात्रात उतरू नये.पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन केले आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' सोसायटीतील नागरिक भयभीत, एकाच रात्री 5 फ्लॅटमध्ये झाल्या घरफोड्या, लाखोंचा माल लंपास

वारंवार इशारे देऊनही नागरिकांकडून निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले असले,तरी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.