Pune News : गुडलक कॅफेमधील बन मस्कामध्ये आढळला काचेचा तुकडा

Pune News : कॅफे मालकाने याबाबत सांगितले आहे की ते बन आउट सोर्स करतात. संबंधित व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमधील बन मस्का खाण्यासाठी खवय्ये लांबून येतात. गुडलक कॅफेबाहेर बन मस्का खाण्यासाठी रोज मोठी गर्दी असते. मात्र या बन मस्का प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गुडलक कॅफेमधल्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळून आले आहेत. 

आकाश जलगी नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्का खाण्यासाठी आला होता. बन मस्का खाताना त्यांना अचानक काही तरी कडक लागले. प्रथमदर्शनीय त्यांना वाटले की बर्फ असावा पण नीट बघितल्यानंतर त्यांना कळले की ते काचेचे तुकडे आहेत. 

( नक्की वाचा : Principal Murder: गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 2 विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यपकाची हत्या! )

याबद्दल कॅफे मालकला सांगितलं असता त्यांनी माफी मागितली आणि बिल घेतले नाही. परंतु आकाश जलगी यांचं म्हणणे आहे की लक्षात आले म्हणून ठीक पण चुकून ते पोटात गेल असत तर मोठा अनर्थ घडला असता. याबाबत FDA ला ऑनलाइन तक्रार आकाश जलगी यांनी नोंदवली आहे. 

(नक्की वाचा-  Pune News : नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या बाळाचा मृ्त्यू; पोलिसांना मात्र वेगळाच संशय)

कॅफे मालकाने याबाबत सांगितले आहे की ते बन आउट सोर्स करतात. संबंधित व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे. म्हणजेच गुडलक कॅफेने आपली जबाबदारी झटकून बन बनवणाऱ्यांची ही चूक असल्याचा  आरोप केला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article