मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात, कारण काय?

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या दोन महिलांचा फोटा वापरण्यात आला आहे त्या महिला आता पुढे आल्या आहेत. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

सुरज कसबे 

राज्यात लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची सर्वत्र जोरदार चर्चाही झाली. ही योजना गेम चेंजर ठरेल असे सरकारलाही वाटत आहे. तर विरोधकांनी या योजनेवर वेगवेगळ्या माध्यमातून टिकाही केली. आता ही योजना नव्या वादात सापडली आहे. वाद विरोधकांनी किंवा अन्य कोणत्या संस्थेमुळे निर्माण झाला नाही. तर हा वाद निर्माण झाला आहे या योजनेतल्या जाहीरातीमुळे. या योजनेसाठी ज्या दोन महिलांचा फोटा वापरण्यात आला आहे त्या महिला आता पुढे आल्या आहेत. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )   

पिंपरी चिंचवड शहरात या योजनेची मोठी जाहीरात करण्यात आली आहे. नुकत्याच या  योजनेसाठी राज्यातल्या जवळपास 1 कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जाहीरात बाजी केली आहे. ही जाहीरात करताना त्यांनी यावर दोन महिलांचे फोटो  लावले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या  कावळे कुटुंबातील या महिला आहे. त्यांच्या फोटो त्यांच्या नातेवाईकांनी जाहीरातीमध्ये पाहीला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विचारणा झाली. त्यांनीही नंतर ही जाहीरात पाहीली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?

ही जाहीरात पाहील्यानंतर कावळे कुटुंबाला धक्का बसला. या योजनेचा लाभ घेतला नाही. किंवा अर्ज ही केला नाही. असे असतानाही हा फोटो कसा काय वापरला गेला असा प्रश्न त्यांना पडला. हा फोटो कोणी दिला? कसा दिला? याचा विचार ते करू लागले. शिवाय पैशासाठी फोटो दिले का? असे विचारणा करणारेही त्यांना भेटले. त्यामुळे नाहक त्रासाला त्यांना सामोर जावे लागले. अशा स्थिती त्यांनी थेट पोलिस स्थानक गाठले. शिवाय या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडांला वेगळं वळण  

आमची परवानगी न घेता हे फोटो कसे छापले अशी विचारणा त्यांनी संबधिताला केली आहे. हे फोटो कुठून आणले असा प्रश्न ही या दोघींनी उपस्थित केलाय. शिवाय या माध्यमातून आमदारांनी आमची बदनामी केली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.  आम्ही पैसे घेऊन फोटो छापायला दिले का ? अशी आम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून विचारणा होत आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. आमदाराच्या एका जाहिरातीमुळे या कावळे कुटुंबीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी कुटुंब प्रमुख अंकुश कावळे यांनी तक्रार दाखल केली आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला काही झाले तर त्याला या जाहीरातीत असलेले नेते जबाबदार असतील असे त्यांनी सांगितले आहे. 
 

Advertisement