Pimpri Chinchwad: प्रियकराची प्रेयसीला अमानुष मारहाण; पोलिसांनी तरुणीला गाठलं पण भलताच ट्विस्ट आला समोर

Pimpri Chinchwad News: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कपड्यांच्या दुकानात घुसून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातून एक संतापजनक घटना  आली आहे. केवळ संशयावरून झालेल्या वादातून एका माथेफिरू तरुणाने प्रेयसीला एका कपड्यांच्या दुकानात उघडपणे बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीचा संपूर्ण थरार दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आधी लाथा-बुक्क्यांनी मारहाण अन् माफी!

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये अत्यंत अस्वस्थ करणारी आहेत, संशयाच्या भुताने पछाडलेला हा तरुण कपड्यांच्या दुकानात घुसतो आणि काही समजण्याच्या आतच तरुणीवर तुटून पडतो. तो तिला ओढून लाथा-बुक्क्यांनी आणि सपासप चापटांनी अत्यंत निर्दयीपणे मारहाण करतो.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

विशेष म्हणजे, प्रेयसीला बेदम मारहाण केल्यानंतर या तरुणाचा राग अचानक शांत होतो. त्यानंतर त्याने तात्काळ त्याच दुकानाच्या फरशीवर बसून प्रेयसीचे पाय धरले आणि तिची माफी मागितली. त्याच्या या विचित्र वर्तनाचा व्हिडिओ पाहून नेटीझन्स चक्रावून गेले आहेत.

VIDEO

तरुणीचा पोलिसांत तक्रार देण्यास नकार

हा गंभीर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी संबंधित तरुणीशी संपर्क साधून कायदेशीर कारवाईची तयारी दर्शवली. मात्र, या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे.

(नक्की वाचा-  Meta News: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्सना मोजावे लागणार पैसे! मेटाने जाहीर केले प्लॅन

इतका गंभीर प्रकार घडून आणि सार्वजनिक ठिकाणी अमानुष मारहाण सहन करूनही, संबंधित तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार देण्यास साफ नकार दिला आहे. "हा आमचा अंतर्गत वाद आहे," असे सांगत तिने कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. तरुणीने घेतलेल्या या मवाळ भूमिकेमुळे पोलीसही कायदेशीर अडचणीत सापडले असले, तरी अशा प्रवृत्तीच्या तरुणाला धडा शिकवलाच पाहिजे, अशी मागणी शहरातील नागरिक आणि महिला संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

Topics mentioned in this article