जाहिरात

Moshi Accident : ढिगाऱ्यातून बायकोला पाठवला शेवटचा सेल्फी; 11 तास मृत्यूशी झुंज, विजयचं हादरवणारं रेस्क्यू

मोशी येथील इमारती दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत, ज्यामध्ये विजय सपकाळ या तरुणाची मृत्यूशी दिलेली झुंज थक्क करणारी ठरली. 

Moshi Accident : ढिगाऱ्यातून बायकोला पाठवला शेवटचा सेल्फी; 11 तास मृत्यूशी झुंज, विजयचं हादरवणारं रेस्क्यू

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri Chinchwad Moshi Accident : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथे बुधवारी भीषण दुर्घटना घडली. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने  दुमजली इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेत कित्येक कर्मचारी अडकून पडले होते. मोशी येथील इमारती दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत, ज्यामध्ये विजय सपकाळ या तरुणाची मृत्यूशी दिलेली झुंज थक्क करणारी ठरली. 

११ तासांनंतर ढिगाऱ्यातून काढलं जिवंत...

या दुर्घटनेत इमारतीमध्ये अडकलेल्या विजय सपकाळ याचा पाय थेट एका पिलरखाली दबला गेला होता. तर खाली खिडकीच्या फुटलेल्या काचा पसरलेल्या होत्या. आपण आता यातून जिवंत वाचणार नाही अशी खात्री पटल्याने, त्याने अखेरचा निरोप समजून आपल्या पत्नीला मोबाईलवरून सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेज पाठवला होता. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत ढिगाऱ्याचं वजन माझ्या पायावर असल्याचं विजयने सांगितलं. अखेर बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ११ तासांनंतर त्याला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. रुग्णालयात उपचारादरम्यान जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आला, तेव्हा समोर उभ्या असलेल्या आपल्या पत्नी आणि मुलीला पाहून त्याला अश्रू अनावर झाले; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या प्रसंगातून विजयचा झालेला पुनर्जन्म सध्या सर्वांनाच भावुक करत आहे.

मोशी डेपो दुर्घटनेत शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या मृत नागरिकांची नावे -

(या सर्व नागरिकांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविले असता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी त्यांना तपासणीअखेर मृत घोषित केले आहे) 

१) अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
२) सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
३) सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), 
४) महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), 
५) नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी)
६) रणजीत पाटील (वय २२, मोशी)
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com