Pimpri Chinchwad Green Bond : पिंपरी चिंचवड महापालिकेत सेतून प्रकल्पासाठी ग्रीड बाँड उभारण्यात यश मिळालं आहे. निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणीनगर चौकादरम्यानचा टेल्को रस्ता विकसित करण्यासाठी 200 कोटी रुपयांचे ग्रीन बाँड उभारण्यात यश मिळालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्राच्या पहिल्या ग्रीन म्युनिसिपल बाँडद्वारे 200 कोटी रुपये यशस्वीरित्या उभारल्याचा पालिकेचा दावा ग्रीन बाँडच्या इश्यूने 513 कोटी रुपयांच्या बोली लागल्याअसून ऑफरपेक्षा 5.13 पट जास्त सबस्क्राइब झाला आहे. 100 कोटी रुपयांचा बेस इश्यू उघडल्यानंतर एका मिनिटात पूर्णपणे सबस्क्राइब झाला.
शहराच्या विकासाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच हवामान बदलामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या प्रकल्पांसाठी हरित रोखे उभारण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखेंच्या उपस्थित मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये याचा कार्यक्रम पार पडला.
(नक्की वाचा- Political News : स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक? मंत्री संजय शिरसाटांवर आणखी एक आरोप)
'ग्रीन बाँड' म्हणजे काय?
ग्रीन बाँड हे उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याकरिता सरकार, कॉर्पोरेशन आणि बहुपक्षीय बँकांद्वारे जारी केले जात असतात. पारंपरिक बाँडपेक्षा कमी उत्पन्नावर ग्रीन बाँड ऑफर केली जातात. मात्र, गुंतवणूकदारांना खात्री दिली जाते की ही रक्कम केवळ हरित गुंतवणुकीसाठी वापरली जाईल.
(नक्की वाचा- Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला)
ग्रीन बाँडमधील गुंतवणूकदारांना अनेकदा स्थिर आणि दीर्घकालीन परतावा हवा असतो. त्यांना त्यांच्या निधीचा काही भाग ग्रीन फायनान्सिंगकरिता वाटप करण्यासाठी वापरता येऊ शकतो. पर्यायवरण प्रकल्पांसाठी निधी जमा करणे हे ग्रीन बाँडचे प्रमुख उद्दिष्ट असते.