Pune News: इंजिनिअर्स, एम टेकसह उच्चशिक्षित तरुणांची पोलीस भरतीसाठी गर्दी, पिंपरीत 462 जागांसाठी 14779 अर्ज

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीत 462 जागांसाठी 14,779 अर्ज आले असून, त्यापैकी 5,423 उमेदवार उच्चशिक्षित आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे पदवीधरांचा ओढा पोलीस दलाकडे वाढला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Police Bharti: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 462 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी सध्या भोसरीतील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात मैदानी चाचण्यांचा थरार सुरू आहे. या भरती प्रक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण शिपाई होण्यासाठी चक्क उच्चशिक्षित तरुणांनी मैदानात उडी घेतली आहे. एकूण अर्जांपैकी सुमारे 36 टक्के उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहेत.

शिक्षणाची थक्क करणारी आकडेवारी

या भरतीसाठी आलेल्या एकूण 14,779 अर्जांमध्ये विविध शैक्षणिक शाखांमधील दिग्गजांचा समावेश आहे. 156 इंजिनिअरिंग पदवीधर आणि 3 एम.टेक (M.Tech) पदवी धारक आहेत. 59 एमबीए (MBA), 23 एमसीए (MCA) आणि 11 एमसीएस (MCS) पदवीधर आहेत.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

एकूण 139 एम.कॉम (M.Com) आणि 93 एम.एससी (M.Sc) पदवीधर तर 1 विधी पदवीधर (Law), 18 एमएसडब्ल्यू (MSW), 294 कला शाखेतील पदव्युत्तर आणि हॉटेल मॅनेजमेंट, पत्रकारिता व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील अनेक उमेदवार आहेत.

पहाटे 4 वाजल्यापासून मैदानावर हजेरी

भोसरीतील इंद्रायणीनगर येथील क्रीडा संकुलात 11 फेब्रुवारीपासून शारीरिक कार्यक्षमता चाचण्यांना सुरुवात झाली आहे.  उमेदवार पहाटे 4 वाजल्यापासून मैदानावर हजेरी लावत आहेत. प्रवेशद्वारावर बारकोड स्कॅनिंगद्वारे उपस्थिती नोंदवली जाते. त्यानंतर उंची आणि छातीची मोजमापे घेतली जातात. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना RFID टॅग आणि चेस्ट नंबर दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली पार पडत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम)

पोलीस भरती चाचणीचे स्वरूप (50 गुण)

  • पुरुष उमेदवारांसाठी: 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक.
  • महिला उमेदवारांसाठी: 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक.
     
Topics mentioned in this article