Live News Updates :
मुंबईतील 125 वर्ष जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) 12 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा पूल पाडून त्या जागी नवीन ‘डबल-डेकर शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर' उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
पुलाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वीही स्थानिकांनी या ठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दंगल नियंत्रण पथकही या ठिकाणी दाखल झाले आहे.
LIVE Update: नालासोपाऱ्याच्या निळेमोरे येथे दरड कोसळली, जीवितहानी टळली
नालासोपारा पूर्वेच्या निळमोरे गावाजवळ शनिवारी सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दरड कोसळलेल्या डोंगरावर अनधिकृतपणे मस्जिद बांधण्यात आली असून यामुळे डोंगर अस्थिर झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारल्या गेल्या आहेत. अनेक वेळा तक्रारी व पत्रव्यवहार करूनही वसई-विरार महानगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
Prakash Mahajan Resign MNS: मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम
पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते, प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. प्रकाश महाजन यांनी फेसबूक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Amravti News: अप्परवर्धा धरणाची 13 दारवाजे पुन्हा उघडले
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अप्परवर्धा धरणाचे १३ दरवाजे ४० सेंटिमीटरने उघडण्यात आलेय. धरणातून सध्या ८४४ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येतेय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
अप्परवर्धा धरणातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून मध्यप्रदेशातील जाम नदी व सालबर्डी येथून वाहणारी माडूनदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने तसेच वर्धा नदीखालील भागातील नदी-नाले इत्यादींचा विसर्ग नदीच्या पात्रामध्ये होत असल्यामुळे अप्पर वर्धा धरणातून 13 दरवाजांच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात जवळपास ९७.८७ टक्के इतका जलसाठा आहे.
Raigad News: मित्राला पुलावरुन नदीपात्रात ढकललं, किरकोळ वादातून हत्या
मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राची पुलावरुन नदी पात्रात ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील शिवथर येथे घडली आहे. तळशीराम गायकवाड असे मयताचे नाव असून तुषार येनपुरे याने तुळशीराम याची पुलावरून नदीच्या पाण्यात लकटून हत्या केली आणि सोबत असलेल्या मित्रांना जीवे ठार मारण्याचा दम भरल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळशीराम गायकवाड, तुषार येनपुरे, रोशन येनपुरे, गणेश सुतार आणि आणखी एक अनोळखी मित्र असे पाच जण कुभे शिवतर येथून आंबे शिवथर येथे किराणामाल घेऊन चालत निघाले होते. यावेळी झालेल्या किरकोळ वादाचे पुर्नवसन मारामारीत झाले. या हत्येची नोंद महाड MIDC पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक परिसरात जीवघेणे मोठे खड्डे
अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक परिसरात जीवघेणे मोठे खड्डे
बस चालकांना बस डेपोत टाकताना आणि बाहेर काढताना होत आहे अडचण
खड्डे मोठे असल्याने अनेकदा बस चालकांचे सुटते नियंत्रण
जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष खड्डे बुजवण्याची बसचालकांची मागणी
Parbhani Rain Update: परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
परभणीतील पूर्णा आणि पालम तालुक्यात मागील 18 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पिंपळा लोखंडे पांढरा ते पूर्णा रस्त्याची वाहतूक खोळंबली आहे. थुना नदीला पुर आल्याने परभणी वसमत राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. पुलावरून पाणी प्रवाहने वाहत असल्याने वाहतूक बराच वेळ कोळंबली होती. पूर्णेतील पांगरा गाव शिवार, पालम तालुक्यातील सातेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर असलेल्या ओढ्याला पाणी आल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मानवी साखळी बनवून रस्ता ओलांडावा लागत आहे. तर या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका सर्वत्र बसलेला आहे. या अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस, ज्वारी तर फळबागामध्ये संत्रा, मोसंबी, या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, शासनाने तात्काळ दखल घेऊन शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्री-राजूर मार्गावर भीषण अपघात; 2 तरुण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री राजूर महामार्गावर पिंपळगाव गांगदेव शिवारात शुक्रवारी रात्री ११ वाजता टेम्पो आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. यात कारचा चुराडा झाला. कारमधील सतीश केशवराव कोलते आणि आदित्य राजू कोलते (२२, दोघेही रा. टाकळी कोलते, ता. फुलंब्री) हे दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी आहेत.अक्षय भगवान कोलते (२५, रा. टाकळी कोलते), अजय बबन सोळुंके (वय २५, रा. रिधोरा, ता. फुलंब्री) आणि अन्य एक जण गंभीर जखमी आहे. हे सर्व कारने रात्री फुलंब्रीकडून टाकळी कोलते या गावी जात होते. पिंपळगाव- गंगादेव शिवारात मोसंबी भरलेला टेम्पो आणि त्यांच्या कारचा समोरासमोर अपघात झाला. यात कारचा चुराडा झाला.फुलंब्री ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
Jalgaon News : कौटुंबिक वादातून जावयाने मामे सासऱ्याची केली हत्या
भुसावळ शहरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या मामाचा पतीने खून केल्याची घटना घडली असून यामुळे भुसावळ शहर हे हादरले आहे. मयत समद शेख याचे गेल्या काही दिवसापासून पत्नी सईदा यांच्यात वाद सुरू होता. दोन दिवसापूर्वी पत्नी घर सोडून गेल्यानंतर कौटुंबिक तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री नातेवाईकांची बैठक घेतली. यावेळी वाद चिघळूण सुभान शेखने पत्नीचा मामा समद शेख यांच्या छाती मान पोटावर चाकूने सपासप वार केले. तसेच सासरा जमील शेख याच्यावरही वार केले असून यात समद शेख याचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
Gadchiroli News: किरकोळ वादातून मुलाची बापाकडून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या
अहेरी तालुक्यातील कोळसेपली गावात किरकोळ वादातून एका पित्यानेच आपल्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण बंडे वेलादी (वय ३८) असे मृताचे नाव असून, आरोपी वडिलांचे नाव बंडे बीरा वेलादी (वय ६५) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपी वडिलांनी कुऱ्हाडीने मुलाच्या डोक्यावर वार केला. गावकऱ्यांनी गंभीर अवस्थेत लक्ष्मणला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असुन आरोपी अटकेत आहे.
जायकवाडी धरणाचे १२ दरवाजे पुन्हा उघडले
पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा १२ दरवाजे अर्धा फुटाने उघडून गोदापात्रात ६ हजार २८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची ही तिसरी वेळ आहे. सध्या धरणात ७ हजार ७३ क्युसेक आवक होत असून, नाथसागराची पाणीपातळी ९९.७८ टक्क्यांवर पोहोचली आहे. आवक होत असताना सुमारे २१ दिवस जायकवाडीतून विसर्ग करण्यात आला. बुधवारी आवक घटल्याने १८ दरवाजे सायंकाळी बंद करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पुन्हा आवक वाढली असून, ७ हजार ७३ क्युसेकने पाणी येत आहे.
Nagpur News: इटारसी पुलाखाली एका बोगद्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
नागपूर शहरात सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटारसी पुलाखाली एका बोगद्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
इटारसी पुलाखालील रेल्वे लाईनपासून काही अंतरावर झुडपामध्ये हा बोगदा आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी येत होती.
एका मेंढपाळाने झुडपातील बोगदा उघडताच त्याला नवजात बाळाचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती मिळताच लोक जमा झाले.
सदर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्यांनी तपास सुरू केला.
PM Modi in Maninpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर, हिंसाचारानंतर दोन वर्षांनी दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला दौऱ्यावर जाणार आहेत. २०२३ च्या हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. म्हणजेच दोन वर्षानंतर पंतप्रधान मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकवेळा मागणी केली होती की पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा करावा. परंतु दोन वर्षांनंतर हा दौरा होत आहे. या दौ-यात पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
OBC Morcha Live: लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद! लोकांची मोठी गर्दी
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या जीआरच्या पार्श्वभूमीवर ओबीसी एकजुटीचा नवा अध्याय लिहिला गेला. प्रा. लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली शिंगारवाडी येथे आयोजित ‘ओबीसी मेळावा सभा’ला रात्री उशिरापर्यंत प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५ किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या, ज्यात हजारो ओबीसी समाजबांधव सहभागी झाले. हजारो १८ पगड जातीच्या माणसांनी एकत्र येऊन दाखवून दिलं की, एकजुटीतच आपली ताकद आहे. हा मेळावा फक्त एक सभा नव्हती, तर ओबीसी समाजाच्या संघर्षाची आणि विजयाची प्रेरणादायी कथा आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.