पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई, ठाणे, वाशीममध्ये अनेक विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाशिममध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपासून मोठ्या संकटाचा सामना केला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
#WATCH वाशिम, महाराष्ट्र: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "नवरात्रि के इस पावन अवसर पर मुझे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 18वीं किस्त जारी करने का अवसर मिला... महाराष्ट्र की डबल इंजन सरकार यहां के किसानों को दोहरा लाभ दे रही है... पोहरादेवी के आशीर्वाद से मुझे अभी लाड़की… pic.twitter.com/Kl5iWfl246
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2024
महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत त्यांचे दोनच अजेंडे होते. पहिला, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प थांबवणे आणि दुसरे म्हणजे या प्रकल्पांच्या पैशातून भ्रष्टाचार करणे. आम्ही केंद्राकडून प्रकल्पांसाठी पैसे पाठवायचो, पण ते नागरिकांपर्यंत पोहोचतच नव्हते. प्रत्येक निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाविकासआघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या होत्या, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
( नक्की वाचा : भारताविरोध ते सख्ख्या भावाशी लग्नाचा आरोप... राहुल गांधी अमेरिकेत भेटले त्या Ilhan Omar कोण आहेत? )
#WATCH वाशिम, महाराष्ट्र: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "महाराष्ट्र के किसानों ने कई दशकों से बहुत बड़ा संकट झेला है। कांग्रेस और उसके सहयोगियों की सरकार ने किसानों को गरीब और बदहाल बनाने में कोई कसर नहीं छोड़ी। जब तक महाअघाड़ी सरकार थी, उनके पास सिर्फ़ दो एजेंडे थे। पहला,… pic.twitter.com/qHRMpWqwZY
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2024
काँग्रेसवरही निशाणा साधताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटीश सरकारने संपूर्ण बंजारा समाजाला गुन्हेगार घोषित केले होते. मात्र स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य सन्मान देणे ही देशाची जबाबदारी आहे. त्यावेळी काँग्रेसच्या धोरणांनी या समाजाला मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवले. ब्रिटीश सरकारप्रमाणे काँग्रेसमधील घराणेही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना आपल्या समान मानत नाही. त्यांना असे वाटते की भारतावर फक्त एका घराण्याने राज्य केले पाहिजे, कारण ब्रिटिशांनी त्यांना हा अधिकार दिला होता.
(नक्की वाचा- परराष्ट्रमंत्री जयशंकर करणार पाकिस्तानचा दौरा, मोदी सरकारनं 9 वर्षानंतर का घेतला निर्णय?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world