
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता कधी मिळणार, याची देशभरातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आधीच जमा झाला आहे, पण उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. या वर्षी सरकारने तीन राज्यांतील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता वेळेआधीच पाठवला आहे.
पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यांतील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता आधीच हस्तांतरित करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने या आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून हा हप्ता ॲडव्हान्समध्ये पाठवला आहे. आता देशातील उर्वरित शेतकरी त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, याची वाट पाहत आहेत.
(नक्की वाचा- RBI Big News : EMI बुडाल्यास तुमचा फोन आता 'बंद' होणार? आरबीआय गव्हर्नरनं दिली 'ही' मोठी माहिती)
21 वा हप्ता कधी जमा होणार?
पीएम किसान योजनेचा अधिकृत तारीख अद्याप सरकारने जाहीर केली नसली तरी, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, ऑक्टोबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 21 वा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( नक्की वाचा : Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲपला टक्कर देणारे 'अरट्टाई' ॲप कशासाठी चांगले? वाचा, 'दोघां'मधील मोठा फरक )
'या' शेतकऱ्यांचे पैसे अडकणार
- सरकारने स्पष्ट केले आहे की, e-KYC न केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळणार नाही. e-KYC तातडीने करणे बंधनकारक आहे.
- तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.
- IFSC कोड चुकीचा असणे, खाते बंद असणे किंवा बँक खाते आधारशी लिंक नसणे अशा त्रुटी असल्यास, पैसे खात्यात येणार नाहीत.
- अर्ज करताना चुकीची कागदपत्रे देणे किंवा माहिती योग्यरित्या अद्ययावत न करणे, यामुळेही अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात.
- तुम्ही तुमच्या बँक तपशिलांची तपासणी करून त्रुटी असल्यास त्या त्वरित अपडेट कराव्यात.
ज्या शेतकऱ्यांनी e-KYC, आधार लिंकिंग आणि योग्य कागदपत्रे ही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली आहेत, त्यांना लवकरच दिवाळीपूर्वी हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. कोणताही SMS अलर्ट किंवा pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवरील नवीन अपडेट तपासत राहा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world