
रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News : पावसाळ्यात शहरातील रस्त्याची चाळण होते. पण पुढे वर्षभरही रस्त्यांना अनेक ठिकणी खड्डे पडलेले असतात. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात. पण नागरिकांना तक्रारी करता येत नाहीत. त्यामुळे आता नागरिकांना थेट तक्रार करता यावी साठी ‘पीएमसी रोड मित्र' हे मोबाईल ॲप तयार केले आहे. लवकरच या ॲपचे उद्घाटन होणार आहे.
फोटोसोबत खड्ड्याच्या ठिकाणचे अक्षांश आणि रेखांशही कळणार व आयुक्तांचेही यावर नियंत्रण असल्याने प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागणार आहे. पीएमसी केअर ॲप, समाज माध्यमावर तक्रार केल्यानंतर तक्रार निवारण न करता परस्पर तक्रार बंद केली जाते. याचा अनुभव पुणेकरांना वारंवार येतो. हा प्रकार टाळण्यासाठी आता ‘पीएमसी रोड मित्र' ॲप तयार केले आहे.

या ॲपद्वारे नागरिक दोन ते तीन फोटो, व्हिडिओ अपलोड करू शकतात. यात जुना फोटो अपलोड करता येणार नाही. नागरिकांना लाइव्ह फोटो तेथे अपलोड करावा लागणार आहे, त्यामुळे वस्तुस्थिती प्रशासनाला समजणार आहे. फोटो अपलोड केल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याला तक्रार आपोआप मिळेल.
नक्की वाचा - Pune News : गुडलक कॅफेत अंडाभुर्जीत सापडलं झुरळ; मुंबई- पुणे हायवेवरील फुडप्लाझातील प्रकार
खड्डा बुजविल्यानंतरचे फोटो त्या तक्रारीसोबत अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे की नाही या समजणे शक्य होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world