PMPML President Mahesh Awhad Car Accident : पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड मुंबईहून पुण्याकडे येत असताना मळवली येथे त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.या अपघातात चालक आणि बॉडीगार्ड गंभीर जखमी झाले असून महेश आव्हाड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिनी व्हॅनच्या चालकाने रस्त्यावर अचानक यू-टर्न घेतला अन्..
महेश आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार,एका मोबाईल मिनी व्हॅनच्या चालकाने रस्त्यावर अचानक यू-टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला “नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो.चालक आणि बॉडीगार्ड जखमी झाले असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे,” असे आव्हाड यांनी सांगितले.घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण-डोंबिवली,अंबरनाथ,बदलापूरला वादळाचा तडाखा, नागरिकांमध्ये घबराट, पाहा काय काय घडलं? Video
कार चालक आणि बॉडीगार्ड गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, महेश आव्हाड मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. मळवली येथे त्यांची कार पोहोचली असता अपघाताची धक्कादायक घटना घडली. मोबाईल मिनी व्हॅनच्या चालकाने वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर अचानक यू-टर्न घेतला. त्यामुळे आव्हाड यांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असून आव्हाड सुदैवाने बचावले आहेत. परंतु, त्यांचा कार चालक आणि बॉडीगार्ड या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर आव्हाड यांना थोडी दुखापत झाल्याचं कळते आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' भागात कचऱ्याचे साम्राज्य, चक्क नाल्यातच क्रिकेट खेळून मनसेनं केलं अनोखं आंदोलन