Pune News : पुण्यात धावणार डबल डेकर बस; सुरुवातीच्या टप्प्यात कसा असेल मार्ग?

एक डबल-डेकर बस सुमारे 2 कोटी किमतीची आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असला, तरी जुन्या डिझेल डबल-डेकर बसेसच्या तुलनेत त्यांचा देखभाल खर्च कमी असेल, अशी अपेक्षा PMPML अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: PMPML पु्ण्यात डबल-डेकर बस सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे. यावेळी या बसेस आधुनिक इलेक्ट्रिक स्वरूपात असणार आहेत. सुरुवातीला ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख IT पार्क क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल, ज्यात हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी या भागांचा समावेश आहे. पुढील आठवड्यात स्विच मोबिलिटीचे एक पथक प्रस्तावित मार्गांची पाहणी करण्यासाठी पुणे शहरात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित असतील. यामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली बसवण्यात येईल. या बसेसना लंडनच्या रेड बसेस प्रमाणे डिझाइन असेल.आरामदायक प्रवासासाठी अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टीम बसमध्ये असेल.

(नक्की वाचा-  Traffic jam: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय; अवजड वाहनांवरील बंदी 2 तासांनी वाढवली)

या प्रत्येक बसमध्ये 70 प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आणि 40 प्रवाशांसाठी उभे राहण्याची व्यवस्था असेल, ज्यामुळे एकावेळी 100 पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करणे शक्य होईल. यामुळे नेहमीच्या बसेसच्या तुलनेत प्रवाशांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. पुणे मेट्रो स्टेशन किंवा उड्डाणपुलांना अडथळा आणणार नाहीत, एवढ्या उंचीच्या या बसेस असणार आहेत.

एक डबल-डेकर बस सुमारे 2 कोटी किमतीची आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असला, तरी जुन्या डिझेल डबल-डेकर बसेसच्या तुलनेत त्यांचा देखभाल खर्च कमी असेल, अशी अपेक्षा PMPML अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Pune News: दलित मुलींचा पोलिसांकडून छळ! रात्रभर ठिय्या तरी तक्रार घेण्यास नकार, संपूर्ण प्रकरण काय?)

PMPML बसेसची आकडेवारी

  • ताफ्यातील बसेसची संख्या: 1,650

  • दैनंदिन प्रवासी संख्या: सुमारे 12 लाख
  • दैनंदिन उत्पन्न: 1.5 कोटी रुपये
  • मार्ग: 381
  • दैनंदिन प्रवास: सुमारे 3.6 लाख किमी

Topics mentioned in this article