Badlapur Municipal Corporation Video Viral : बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलं आहे. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक प्रभाकर पाटील यांनी आक्षेपार्य विधान केलं. त्यामुळे म्हात्रे यांचे भाऊ आणि नगरसेवक वामन म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे चांगलेच संतापले.त्यातूनच भर सभागृहात जोरदार हमरी तुमरी झाली. त्याचे पडसाद पालिकेच्या आवारात पाहायला मिळाले.
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत पोलिसांसमोरच गोंधळ घातला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे सभागृहात राडा झालेला असतानाच पोलिसांच्या उपस्थितीत इतक्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पालिका आवारात शिरलेच कसे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच बदलापूर पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. राजकीय वातावरण तापलेलं असतानाच नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यामुळे पुढील राडा टळला.