ठाकरेंच्या मतदार संघात पोस्टर वॉर, मनसेच्या 'त्या' पोस्टरची चर्चा

अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचणारे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात चांगलाच जोर लावण्याचे ठरवले आहे. या मतदार संघातून मनसेचे संदिप देशपांडे हे संभाव्य उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा आहे. त्या दृष्टीने संदिप देशपांडे हे कामालाही लागले आहेत. आधी अमित ठाकरे यांनी वरळी विधानसभेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना डिवचणारे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहे. या बॅनरची चर्चा मात्र मतदार संघात आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

वरळीत लागले पोस्टर 

वरळीत मनसेने पोस्टर लावले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. 'बर्फातला प्राणी बर्फातच पाठवू, संदीप देशपांडे यांना निवडून आणू' असे पोस्टर वरळीत लावण्यात आले आहे. वरळीतून मनसे उमेदवार रिंगणात असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मनसेने या मतदार संघात तयारी सुरू केली आहे. शिवाय संदीप देशपांडे हे ही या मतदार संघात चांगलेच सक्रीय झाले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षाच चांगलेच वाक युद्ध रंगले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'सुपारीबाज पक्ष,शर्ट घालून या' ठाकरे बंधुत वाकयुद्ध रंगलं

ठाकरे विरूद्ध देशपांडे सामना रंगणार? 

राज ठाकरे यांनी मुंबईत आपले उमदेवार कोण असणार याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून संदीप देशपांडे आणि माहिममधून नितीन सरदेसाई हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यानुसार वरळीतून आदित्य ठाकरे विरूद्ध संदीप देशपाडे यांच्या ही लढत होईल. संदीप देशपांडे हे शिवसेने विरोधात नेहमीच आक्रमक भूमीक घेत असतात. याआधीही त्यांनी उद्धव ठाकरें बरोबरच आदित्य ठाकरे वरही जोरदार टिका केली आहे. लोकसभेतील विजयावर बोलताना हा विजय हिरवा विजय असल्याची टिकाही देशपांडे यांनी केली होती. एक आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. तर विधानसभा निवडणूक लढवली आहे. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.

ट्रेंडिंग बातमी -  '... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले

काय म्हणाले होते अमित ठाकरे? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आदित्य हे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात काहीच केले नाही असा थेट आरोप त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात काही करता आले नाही ते तीन महिन्यात काय करणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते मतदार संघात फिरलेही नाहीत. कोळी वाड्याचे प्रश्न आजही तसेच आहे. या साठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असा टोलाही अमित यांनी आदित्य यांना लगावला. 

Advertisement

आदित्य ठाकरे यांचे जोरदार उत्तर 

आदित्य यांनी मनसेचा उल्लेख सुपारीबाज पक्ष असा केला. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. निवडणुका आल्या की हे पक्ष उगवतात. मते खाण्याची त्यांची कामे आहेत.अशा शब्दात त्यांनी मनसेचा समाचार घेताल. बिनशर्त पाठिंब्याचीही त्यांनी खिल्ली उडवली.मला पराभूत करायचं असेल तर बिनशर्त वाल्यानी शर्ट घालून यावे असे ते म्हणाले. निवडणुका आल्या की ते स्टंटबाजी करतात असा आरोपही आदित्य यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.  

Advertisement