आदित्य ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात वरळी मतदार संघात काहीच केले नाही. आता तिन महिन्यात काय होणार? अशा शब्दात मनसे नेते अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही बिनशर्त, पाठिंबावाल्यांनी आता 'शर्ट' घालून यावे,सुपारीबाज पक्षावर जास्त बोलण्याची गरज नाही अशा शब्दात अमित यांना डिवचले आहे. मनसेच्या विधानसभा अभियानाची सुरूवात अमित ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून केली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आदित्य ठाकरे यांचे जोरदार उत्तर
अमित ठाकरे यांच्या टिकेला आदित्य ठाकरे यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले आहे. मनसेने तुम्हाला वरळीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुम्ही निडून आलात. पण तुम्ही कामे केली नाहीत अशी अमित ठाकरे यांनी टिका केली होती. यावर बोलताना आदित्य यांनी मनसेचा उल्लेख सुपारीबाज पक्ष असा केला. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. निवडणुका आल्या की हे पक्षा उगवतात. मते खाण्याची त्यांची कामे आहेत. अशा शब्दात त्यांनी मनसेचा समाचार घेताल. बिनशर्त पाठिंब्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मला पराभूत करायचं असेल तर बिनशर्त वाल्यानी शर्ट घालून यावे असे ते म्हणाले. निवडणुका आल्या की ते स्टंटबाजी करतात असा आरोपही आदित्य यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.
ट्रेंडिंग बातमी - सानिया मिर्झा मोहम्मद शमी बरोबर लग्न करणार? सानियाचे वडिल काय म्हणाले?
काय म्हणाले होते अमित ठाकरे?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर आदित्य हे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात काहीच केले नाही असा थेट आरोप त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात काही करता आले नाही ते तीन महिन्यात काय करणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते मतदार संघात फिरलेही नाहीत. कोळी वाड्याचे प्रश्न आजही तसेच आहे. या साठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असा टोलाही अमित यांनी आदित्य यांना लगावला.
ट्रेंडिंग बातमी - '... त्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता' ठाकरे ठाकरेंवर भडकले
बिनशर्त पाठिंब्यावरून टोलेबाजी
वरळी विधानसभा मतदार संघात मनसेने आदित्य ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता याची आठवण अमित ठाकरे यांनी करून दिली. त्यावेळी दिलेला बिनशर्त पाठिंबा घेतला. तो त्यांना चालला.त्यावेळी त्यांना काही वाटलं नाही. आमच्या पाठिंब्यावर मुलाला त्यांनी आमदारही केले. असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेत अमित ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. या मतदार संघात काहीच कामे झाली नाहीत असेही ते म्हणाले. राज ठाकरेंनी स्वत:च्या हिंमतीवर पक्ष उभा केला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान विधानसभेच्या मोहिमेची सुरूवात वरळीतून करत असल्याचे अमित म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world