Mumbai Children Kidnap: : 'चुकीचं घडलं तर मुलांना आग लावेल', 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्यानं काय दिली धमकी? Video

Mumbai Children Kidnap: मुंबईमधील एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांसह 19 जणांना एका माथेफिरुनं ओलीस ठेवल्यानं मोठी खळबळ उडाली होती.  

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Children Kidnap: मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपीने व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून खळबळ उडवून दिली.
मुंबई:

Mumbai Hostage Crisis: मुंबईमधील एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या 17 मुलांसह 19 जणांना एका माथेफिरुनं ओलीस ठेवल्यानं (Mumbai Children Kidnap) मोठी खळबळ उडाली होती.   ही घटना पवई येथील आरए स्टुडिओमध्ये घडली. मात्र, मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला काही वेळातच ताब्यात घेतले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पवई परिसरात असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील आरए स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सुमारे 100 मुले जमली होती. याच दरम्यान रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 19 जणांना ओलीस ठेवले. त्यामध्ये 17 मुलांचा समावेश होता.

व्हिडिओ मेसेजद्वारे दहशत

मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आरोपीने व्हिडिओ मेसेजच्या माध्यमातून खळबळ उडवून दिली. त्याने मेसेजमध्ये म्हटले होते की, "मी रोहित आर्य आहे. मी आत्महत्या करण्याऐवजी काही मुलांना बंधक बनवले आहे. माझ्या फार मोठ्या मागण्या नाहीत. माझे काही प्रश्न आहेत. मला काही लोकांकडून उत्तरे हवी आहेत. मी कोणताही दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी नाहीये. मी एका नियोजनानुसार मुलांना बंधक बनवले आहे."

या व्हिडिओमध्ये तो लोकांना धमकावतानाही दिसला. " काही चुकीची हालचाल केली, तर मी मुलांना आग लावून देईन," अशी धमकी त्याने दिली. तसेच, "मी एकटा नाही, माझ्यासोबत आणखी लोक आहेत. मला माझे म्हणणे मांडायचे आहे," असेही तो म्हणाला.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai News: मुंबईच्या पवईत हाय व्होल्टेज ड्रामा, एका माथेफिरुने अनेक मुलांना ठेवलं ओलीस! वाचा सर्व अपडेट )
 

पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन

या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये तात्काळ धावपळ सुरू झाली. मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मुलांचे पालक आणि इतर लोकही घटनास्थळी जमा झाले होते. सुदैवाने, मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेतले आणि सर्व बाहेर काढले.
 

Topics mentioned in this article