Mumbai Powai Hostage Crisis: मुंबईतील पवई भागात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. पवईमध्ये एका व्यक्तीनं ऑडिशनसाठी आलेल्या काही लहान मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आणि तातडीने विशेष बचाव मोहीम (Special Operation) सुरू करण्यात आली. रोहित आर्या असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. काही वेळामध्ये या सर्व मुलांची सुटका करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रोहितला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील आर.ए. स्टुडिओमध्ये एका ऑडिशनसाठी सुमारे 100 लहान मुले जमली होती. याच दरम्यान, रोहितने त्यापैकी सुमारे 20-25 मुलांना ओलीस बनवले. या सर्व मुलांचे वय हे 15 च्या जवळपास होते. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित हा मानसिकरित्या अस्वस्थ (Mental Illness) आहे.
जिथे मानसिकरित्या अस्वस्थ असलेल्या एका व्यक्तीने ऑडिशनसाठी आलेल्या काही लहान मुलांना बंधक बनवले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आणि तातडीने विशेष बचाव मोहीम (Special Operation) सुरू करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस दलाचे जवान आणि विशेष कमांडो (Special Commandos) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वप्रथम आरोपीशी बोलणी सुरू केली. आरोपी काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे मागत होता, ज्याचा प्रतिसाद देऊन मुलांना सुरक्षित सोडवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. विशेष कमांडो पथकांनी त्वरीत कारवाई करत आपला ऑपरेशन सुरू केले आणि सर्व ओलीस विद्यार्थ्यांची सुटका केली. तसंच आरोपी रोहितची सुटक करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world