Prakash Ambedkar : सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरण, औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस

Somnath Suryanavshi Case : बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एक सारखे आहे. बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Somnath Suryavanshi Case : परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली. 

न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे काय करावे? याविषयी कायदा अपूर्ण आहे. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात नियमावली तयार करावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात SIT नेमण्याची मागणीही त्यांनी केली. 

Advertisement

(नक्की वाचा- मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार, विकासकामांना गती मिळणार; CM फडणवीसांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती)

ही SIT कोर्टाने नेमावी आणि कोर्टाच्या अधिपत्याखाली ती चालावी. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात आरोपी हे राज्य सरकार आहे. त्यामुळे प्रकरणात आरोपी असलेले राज्य सरकार त्याच प्रकरणाचा तपास कसा करू शकतो? असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात केला.
 
बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एक सारखे आहे. बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात केली. मध्यंतरी CID ने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत चौकशी केली होती, त्याविषयी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, पुढच्या सुनावणीच्या वेळी CID ला आरोपी करू. 

Advertisement

(नक्की वाचा-  KDMC : पुण्यातील प्रकरण ताजं असताना कल्याणही हादरलं, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू)

हायकोर्टकडून राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना नोटीस जारी करण्यात आली आहे. 29 एप्रिल पूर्वी आपले म्हणणे सादर करायला सांगितले आहे. या प्रकरणी 29 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article