जाहिरात

Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला

Prashant Koratkar : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. दुबईमधील कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला

संजय तिवारी, नागपूर

शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी फरार असलेला प्रशांत कोरटकर कुठे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान कोरटकरवरचा कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील प्रशांत कोरटकरला दणका दिला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर दुबई पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती आहे. दुबईमधील कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे. कोरटकरचा हा फोटो नवीन आहे की जुना आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

दंगलीचा आधार घेऊन पळाला- अमोल कोल्हे

प्रशांत कोरटकर पातळात गेला तरी त्याला शोधून आणणे सरकारसमोरील आव्हान ठरल्याची टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्ह यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत म्हटलं की, " कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे."

(नक्की वाचा-  पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)

(नक्की वाचा- Election Commission : निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले)

तपास भरकटवण्याचा प्रयत्न

प्रशांत कोरटकरचा एक दुबईचा फोटो समोर आला आहे. मात्र हा फोटो जुना असण्याची दाट शक्यता आहे. प्रशांत कोरटकरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नोव्हेंबर 2023 मधील असेच फोटो आहेत. त्यामुळे कोरटकरचा हा फोटो कुठून आला. कोरटकर चंद्रपूरला असल्याची चर्चा सुरु असताना, ही माहिती समोर आल्याने तपास भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: