Premanand Maharaj Video Viral : प्रेमानंद महाराज यांच्या आरोग्याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समजते. पण प्रेमानंद महाराजांची प्रकृती ठीक असल्याचं आश्रमातील भाविकांचं म्हणणं आहे. अशातच प्रेमानंद महाराजांच्या एक भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अनेक भक्तांची चिंता वाढली आहे. व्हिडीओ पाहून महाराजांच्या भक्तांचे डोळे पाणावले आहेत. राधा-राणी त्यांची प्रकृती स्थिर करेल आणि त्यांना पुन्हा भक्तामार्गाच्या प्रवासात सामील करेल, अशी मागणी त्यांच्या भक्तांकडून देवाकडे केली जात आहे. अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त झालेल्या प्रेमानंद महाराजांना डायलिसिसच्या वेदनांनाही सामोरं जावं लागत आहे.
एका प्रवचनादरम्यान, प्रेमानंद महाराजांनी म्हटलं होतं की, जेव्हा ते वृदांवनमध्ये आले, तेव्हा ते एका आश्रमात राहत होते. पण एक दिवस महंतांच्या लक्षात आलं की, महाराजांची किडनी खराब झाली आहे. तेव्हा त्यांनी प्रेमानंद महाराजांना तातडीनं आश्रम सोडण्यासाठी सांगितलं. त्यांच्या आश्रमात महाराजांना काही होऊ नये, यासाठी त्यांनी महाराजांना बाहेर पाठवलं. त्यानंतर महाराज म्हणाले, की त्यावेळी मला तोंड लपवण्यासाठीही जागा नव्हती. पण राधाराणीची कृपा अशी झाली की, आता कोणतीच समस्या नाही.
नक्की वाचा >> नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर?
कशी आहे प्रेमानंद महाराजांची प्रकृती?
प्रेमानंद महाराजांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी मथुराच्या एका लॅबमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी प्रेमानंद महाराज पोहोचले होते. त्यांच्या पोटात सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. प्रेमानंद महाराजांचे शिष्य त्यांना बिरला मंदिरजवळ असलेल्या एका पॅथोलॉजीमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महाराजांच्या एका शिष्याचं म्हणणं आहे की, महाराज एक रुटीन चेकअप करण्यासाठी गेले होते. त्यानंतर महाराजांच्या शिष्यांनी त्यांचं आरोग्य ठीक होण्यासाठी ब्रजवासी तीर्थ पुरोहित बांके बिहारी मंदिरात पूजा केली.
अशातच प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भजन मार्ग या प्रोफाईलवरून इंटरनेटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, प्रेमानंद महाराज भावुक झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरु आहेत. मागच्या बाजूने महाराजांचा आवाज येतो आणि ते म्हणतात, याला कदाचित इश्क म्हणतात.त्यानंतर कृष्ण देवाचं वेष धारण केलेल्या एका भक्तानं महाराजांचे अश्रू पुसले.
नक्की वाचा >> 'मुंबई महापालिका एकत्र लढणार, पण ठाण्यात...' भाजपच्या बड्या नेत्यानं उडवली खळबळ