जाहिरात

नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर', खळबळजनक माहिती समोर

नवी ओळख..3 पासपोर्ट अन् खोट्या पदव्या..BARC चा बोगस शास्त्रज्ञ कसा बनला 'अलेक्झांडर पामर', खळबळजनक माहिती समोर
मुंबई:

पारस दमा, प्रतिनिधी

Akhtar AKA Alexander latest News Update : भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच BARC चा शास्त्रज्ञ असल्याची खोटी माहिती सादर करून जगभर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्य आहेत. या व्यक्तीकडे अणुबॉम्ब बनवण्याचे काही नकाशे आणि कागदपत्रे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद असं या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. आरोपीचं अलेक्झांडर पामर असल्याचं एका ओळखपत्राच्या माध्यमातून समोर आलं आहे.अख्तर अहमदची नवी ओळख, तीन पासपोर्ट आणि बोगस ड्रिग्रीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. एलेक्जेंडर पाल्मर पामर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आरोपीचा जीवन प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात उघड झालं आहे की, बोगस शास्त्रज्ञ म्हणून जगभर फिरणाऱ्या अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद (60) ने जवळपास दोन दशकांपर्यंत स्वत:चा चेहरा बदलून एक वेगळं आयुष्य जगलं होतं. त्याने अलेक्झांडर पामर नावाने एक ओळखपत्र बनवलं होतं. या ओळखपत्राच्या माध्यमातून एक बोगस कागदपत्रे, नोकरी संदर्भातील कागदपत्रे आणि कमीत कमी तीन भारतीय पासपोर्टही बनवले होते. 

नक्की वाचा >> Viral : गर्लफ्रेंडचा फोटो बघताच बापाची सटकली, आई ढसाढसा रडू लागली अन्..एका परफ्युममुळे मुलाचं घाणेरडं कांड आलं समोर!

आरोपीच्या वर्सोवा येथील घरी सापडले अनेक पुरावे 

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीच्या वर्सोवा येथील घराची झडती घेतल्यानंतर अनेक पुरावे सापडले. ज्यामुळे त्याचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. सुरुवातीच्या तपासादरम्यान आरोपी अहमदकडे कागदपत्रे आणि 14 नकाशे सापडले होते. आता पाल्मरच्या नावावर असलेल्या दहावी-बारावीच्या मार्कशीट, रांची विद्यापीठाचे बीएससी (B.Sc), BPUT-Rourkela,B.E आणि MBA सारखे प्रमाणपत्र आणि अनेक बोगस कंपनी-आयडी सापडले आहेत. पाल्मर नावाचा वापर करून आरोपी अहमदने परदेश दौराही केल्याचं समजते. तिन्ही पासपोर्टही बोगस नावाने बनवण्यात आले होते.

यामुळे आरोपीने पदरेशात खोट्या कागदपत्रांचा वापर करून हेरगिरी केल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. अख्तर हुसैनने पाल्मर नावाने आधार कार्ड, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारखे ओळखपत्रही बनवले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीकडून तीन वेगवेगळे पासपोर्टही जप्त केले आहेत. या पासपोर्टच्या माध्यमातून त्याने कोणत्या देशांमध्ये प्रवास केला, याचाही तपास लावला जात आहे. तसच आरोपी एका कंपनीच्या सीनियर सेफ्टी मॅनेजर पदाचा ओळखपत्रही वापरत असे, असंही खुलासा करण्यात आला आहे. 

नक्की वाचा >> आधी केस मोकळे सोडले अन् नंतर झिंज्या उडवल्या, या हँडसमसोबत श्वेता तिवारी थिरकली, दिवाळी पार्टीचा Video व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com