Pune News : पुण्यातील फिश मार्केटमध्ये झालाय मोठा बदल! 'हा' मासा विकला जातोय प्रति किलो 1900 रुपये, कारण..

अमेरिका,इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतातून गल्फ देशांकडे होणाऱ्या समुद्री अन्नाच्या निर्यातीला बसला आहे.ही निर्यात थांबल्यामुळे पुण्यातील फिश मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Fish Market Latest News
पुणे:

Pune Fish Market Latest News : अमेरिका,इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतातून गल्फ देशांकडे होणाऱ्या समुद्री अन्नाच्या (Seafood) निर्यातीला बसला आहे.ही निर्यात थांबल्यामुळे पुण्यातील फिश मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. परदेशात पाठवला जाणारा प्रीमियम “डिलक्स पापलेट (Pomfret) मासा आता पुण्याच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे.याबाबत गणेश पेठ फिश मार्केटमधील व्यापाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. दररोज 70-80 किलो डिलक्स पापलेट मासा मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. हा मासा प्रति किलो 1900 रुपयांपर्यंत विकला जात आहे.  

भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील ताजा आणि फ्रोझन म्हणजेच गोठवलेला  पापलेट मासा विशेषत: गल्फ देशांमध्ये निर्यात केला जातो. तसच कुवेतमध्ये डिलक्स पापलेटला मोठी मागणी आहे. हा पापलेट मासा जवळपास 700 ग्रॅम ते 1 किलो वजनाचा असतो. तो मासा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने तो प्रिमियम प्रकारात मोडला जातो.

Advertisement

नक्की वाचा >> Mumbai News: मुंबईतील लाडक्या बहि‍णींचा व्यवसाय डबघाईला, CSMT जवळचं 'कुटुंबसखी' हॉटेल बंद पडणार? कारण काय?

डिलक्स पापलेटसोबतच सुपर पापलेट आणि कापरी पापलेट

त्यामुळे या माशाला मार्केटमध्ये जास्त किंमत मिळते. व्यापाऱ्यांना या पापलेटची निर्यात करणे फायद्याचे वाटते. कारण हे पापलेट विक्री केल्याने मोठा नफा मिळतो. पण सध्या निर्यात ठप्प झाल्यामुळे हा मासा स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे.डिलक्स पापलेटसोबतच सुपर पापलेट आणि कापरी पापलेट अशा इतर जातींचे मासेही बाजारात उपलब्ध होत आहेत. या माशांचे वजन जवळपास 500 ते 600 ग्रॅम इतके असते.तसच त्यांचा दर प्रति किलो 1500 ते 1700 रुपयांपर्यंत आहे.

नक्की वाचा >> Navi Mumbai: थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिका ACTION मोडवर, 'या' ठिकाणी केली मोठी कारवाई

गणेश पेठ मार्केटमधील मासे विक्रेते ठाकूर परदेशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, "सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीमुळे कुवेत आणि इतर गल्फ देशांकडे होणारी निर्यात तात्पुरती थांबवण्यात आली आहे.यामुळे जो डिलक्स पापलेट मासा नेहमी परदेशात पाठवला जातो,तो आता लोकल मार्केटमध्ये येत आहे.निर्यात पुन्हा सुरू झाली की,येथील पुरवठा पुन्हा कमी होईल".