Chhatrapati Sambhajinagar: खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचा 11 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; नागरिकांनी दिला चोप

Chhatrapati Sambhajinagar Crime News : विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.  घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar : खासगी शिकवणी घेणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाने 11 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीत ही घटना घडली आहे. सुभाष जाधव असे खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.  

विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.  घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.  वाळुज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे. घाणेरड्या कृत्यामुळेच दीड वर्षांपूर्वी आरोपी सुभाष जाधव या शिक्षकाला शाळेतून काढले होते, अशीही माहिती समोर आली आहे. 

(ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी)

सामाजिक कार्यकते दीपक बडे यांनी याबाबत सांगितलं की, एक जोडपं मागील 18 वर्षांपासून रांजणगाव शेणपुंजी येथे वास्तव्यास आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी एका खासगी शिकवणीत शिक्षण घेते. त्या शिकवणी चालकाने या मुलीवर अमानूषपणे बलात्कार केला आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी एकदा घडली आणि शनिवारी एकदा घडली. 

(ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?)

यामुळे घाबरलेली मुलगी शिकवणीला जाण्यास नकार देत होती. मात्र शिकवणीला जात नाही म्हणून तिच्या पालकांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. माणूसकीला काळीमा फासणारी घडना येथे घडली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article