Pune News : तिसऱ्या मजल्यावरच्या ग्रीलमध्ये अडकली चिमुकली, घरात कुणीही नाही! पाहा थरारक Video

Pune Child Video : पुण्यातल्या कात्रज परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. कात्रजमधील खोपडेनगर भागातील एक मुलगी खिडकीजवळ खेळता-खेळता अचानक ग्रीलमध्ये अडकली

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Video : खेळता-खेळता चिमुकली खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune Child Video : पुण्यातल्या कात्रज परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. कात्रजमधील खोपडेनगर भागातील एक मुलगी खिडकीजवळ खेळता-खेळता अचानक ग्रीलमध्ये अडकली. मुलगी लटकल्यानं ती जोरात रडू लागली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी तिच्या घरात कुणीही नव्हतं. पण, 'देव तारी त्याला...' या म्हणीचा प्रत्यय या चिमुरडीला आणि तिच्या पालकांना अनुभवता आला. ही मुलगी या अपघातामधून आश्यर्यकारक पद्धतीने वाचली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

काय आहे घटना?

या घटनेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, खोपडेनगर भागातील 4 वर्षांची चिमुकली सकाळी 9 च्या सुमारास घरात झोपली होती. ती झोपली असल्यानं तिची आई तिला घरीच सोडून तिच्या मोठ्या बहिणीला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेली. आई घराबाहेर गेल्यानंतर चिमुरडी उठली. ती बेडरुमच्या खिडकीजवळ खेळत असताना अचानक खिडकीच्या ग्रीलमध्ये अडकली. तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलमध्येच ती अडकली होती. त्यामुळे तिला काहीही कळत नव्हते. त्यामुळे स्वाभाविकच चिमुरडी जोरजोरात रडू लागली.

( नक्की वाचा : Mumbai News : रिक्षा आणि टॅक्सी तक्रारीसाठी परिवहन विभागानं सुरु केला टोल फ्री क्रमांक, हा नंबर करा सेव्ह! )
 

चिमुकलीचा रडण्याचा आवाज समोरच्या बिल्डींमधील उमेश सुतार यांनी ऐकला. त्यांनी  शेजारीच राहणाऱ्या लीड फायरमन योगेश चव्हाण यांना याबाबत सांगितलं. चव्हाण यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखत चिमूरडी अडकलेल्या इमारतीकडे धाव घेतली. 

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चिमुकलीच्या घराचे दोन दरवाजे उघडले. त्यानंतर अवघ्या पाच ते 6 मिनिटांमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये  अडकलेल्या चिमुकलीला सुखरुप बाहेर काढले. आणि, मुलीला आईच्या हवाली केले.

Advertisement

देव तारी त्याला...

फायरमन योगेश चव्हाण आज सुट्टीवर नसते तर कदाचित फायर ब्रिगेड घटनास्थळी येईपर्यंत मुलीला गंभीर इजा होऊ शकली असती. तिच्या जीवावर बेतण्याचाही धोका होता. सुट्टीवर असूनही चव्हाण यांनी कर्तव्य बाजवत चिमुकलीचे प्राण वाचवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे. त्याचबरोबर पालकांनी मुलाला एकटं सोडून घराबाहेर जाताना योग्य ती खबरदारी घेण्याची गरजही व्यक्त होत आहे. 
 

Topics mentioned in this article