
Rickshaw and Taxi complaints toll free number : मुंबई महानगरामध्ये वाहनाची संख्या रोज वाढत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहने म्हणजेच टॅक्सी, रिक्षा, खाजगी प्रवासी वाहने अॅप आधारित सार्वजनिक वाहने (उदा. ओला,उबेर इ.) या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना हा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबईकडून टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. टोल फ्री क्रमांकावर प्रवाशांना तक्रार करता येणार आहे.
कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?
मुंबई महानगरात या वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये
- प्रवाशांना भाडे नाकारणे (Fare refusal)
- प्रवाशांशी उध्दट वर्तन / गैरवर्तन (Rude behaviour)
- अधिकचे भाडे आकारणे (excess fare)
- सार्वजनिक वाहनात प्रवाशांकडून वस्तू विसरल्यास त्या परत न करणे.
- प्रवाशांना लांबच्या रस्त्याने /दुरून इच्छित स्थळी पोहचविणे
- वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसविणे
- नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालविणे या प्रमुख अडचणींचा समावेश आहे.
( नक्की वाचा: Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
कुठे करणार संपर्क?
रिक्षा, टॅक्सी तसेच प आधारित ओला, उबेर इत्यादी वाहनांच्या चालकांविरुध्द प्रवाशांना भाडे नाकारणे, गैरवर्तन, अतिरिक्त भाडे आकारणे, अशा प्रकारच्या तक्रारी करीता प्रवाशांना तक्रारीचे निरसन करता यावे, बेशिस्त चालकाविरुध्द कारवाई करता यावी याकरीता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी (RTO विभाग प्रवासी मदत कक्ष) - टोल फ्री क्रमांक - 1800-220-110 प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे सुरु करण्यात आला आहे.
( नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीतील पलावा पुल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद! काय झाला गोंधळ? )
16 जून 2025 पासून हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. 24 तास हा टोल फ्री क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क करुन तुम्ही तक्रार करु शकता, असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world