जाहिरात

Pune Accident: स्कूल बसमध्ये 50 चिमुकले, मद्यधुंद चालक अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा Video

ते लक्षात येताच स्थानिक लोकांनी या चालकाला जबर चोप दिला. शिवाय याची माहिती पोलीसांना दिली.

Pune Accident: स्कूल बसमध्ये 50 चिमुकले, मद्यधुंद चालक अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा Video
  • पुण्यातील वडकी येथे मद्यधुंद स्कूलबस चालकाने जवळपास पन्नास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकला होता
  • मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकामुळे स्कूलबस नियंत्रणाबाहेर जाऊन विहीरीच्या कठड्याला आदळली
  • अपघातानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडा-ओरडा केला आणि स्थानिक लोकांनी चालकाला ताब्यात घेतले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

यशपाल सोनकांबळे 

स्कूल बस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का याबाबत वारंवार चर्चा झाली आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक नियम ही केले गेले आहेत. पण ते किती स्कूलबस चालक मालक पाळतात याबाबत आज ही प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या असे आदेश आहेत. पण त्यालाच हारताळ फासताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील वडकी या ठिकाणी घडली आहे. इथं एका मद्यधुंद बस चालकाने जवळपास 50 चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकला होता. या चालकामुळे स्कूलबसचा अपघात झाला. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्कूलबस आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

वडकी येथे मोडक इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेवून ही बस शाळेकडे निघाली होती. या बसमध्ये जवळपास 50 विद्यार्थी होते. ही बस वडकीच्या दिशेने जात होती. या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे तो बस वेगाने चावत होता. त्याच वेळी त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले. बस रस्त्याच्या शेजारी उतरली. त्यानंतर ती बस बाजूलाच असलेल्या एका विहीरीच्या दिशेने गेली. विहीर पुर्ण पणे पाण्याने भरली होती. पण विहीरीच्या बाजूला लोखंडी सळ्यांचा कठडा होता. त्याच कठड्यावर बस आदळली. 

नक्की वाचा - Pune News: मिसिंग लिंकवर पहिला मोठा अपघात, तिन कार एकमेकांना धडकल्या, अपघाताचं कारण आलं समोर

कठडा असल्याने बस त्याच ठिकाणी थांबली. काही फुटांचे अंतर होते. नाहीत ही बस विहीरीत कोसळली असती. होत्याचं नव्हतं झालं असतं. मुलाचं नशिब बलवत्तर होतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बस अनियंत्रित झाल्यानंतर मुलं घाबरली होती. बस जशी विहीरीच्या कठड्याला आदळली आणि थांबली त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी एकच आरडा ओरडा केला. त्यांचा हा आक्रोश ऐकून जवळच्या गावातील लोक अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी स्कूल बसच्या चालकाला ताब्यात घेतला. त्याची अवस्था उभी राहण्याची ही नव्हती. तो मद्यधुंद अवस्थेत होता. ते लक्षात येताच स्थानिक लोकांनी या चालकाला जबर चोप दिला. शिवाय याची माहिती पोलीसांना दिली. 

नक्की वाचा - Pune News: मुंबई- पुणे बुलेट ट्रेन! 48 मिनिटांचा सुसाट प्रवास, पुणे हैदराबाद ही जवळ येणार, पुढचा प्लॅन ठरला

तो पर्यंत स्थानिक नागरिकांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बस मधून सुखरूप बाहेर काढले. या अपघातात मुलांना कोणती ही इजा झाली नाही.  तो पर्यंत घटनास्थळी हडपसर पोलीस दाखल झाले. त्यानंत संतप्त नागरिकांनी चालकाला त्यांच्या हवाली केले. या अपघाताची माहिती संबंधीत विद्यार्थ्यांचा पालकांना समजली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे या संदर्भात जाब विचारला.  शिवाय स्कूलबसच्या चालका विरोधात कडक कारवाई करम्याची मागणी ही केली आहे. दरम्यान या चालकाला निलंबित ही करण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com