Pune News : रांजणगाव गणपती मंदिरासमोर सर्वात भयानक घटना! पुणे-अहिल्यानगरच्या प्रवाशांची पळापळ

अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर आज धावत्या प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बस पुण्याहून अहिल्यानगरकडे जात असताना बसला आग लागली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ranjangaon Bus Fire Accident News
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Ranjangaon Bus Fire News : अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर आज धावत्या प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बस पुण्याहून अहिल्यानगरकडे जात असताना बसला आग लागली. मात्र बसमधील प्रवाशांनी आणि चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 प्राथमिक माहितीनुसार,बस पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेने प्रवास करत असताना रांजणगाव गणपती मंदिरासमोर बसमधून अचानक धूर निघत असल्याचे चालक आणि प्रवाशांच्या लक्षात आले. संभाव्य धोका ओळखत चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. दरम्यान, काही क्षणांतच बसने पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

नक्की वाचा >> Dhurandhar 2 Review: ल्यारीतच नव्हे, बॉक्स ऑफिसवरही बादशाह बनणार रणवीर सिंग, धुरंधर 2 चा फर्स्ट रिव्ह्यू समोर

बसला आग लागण्याचं नेमकं कारण काय?

या आगीत बसचे अर्ध्याहून अधिक नुकसान झाले असून बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. तसेच बसमधील काही प्रवाशांच्या बॅगाही आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने प्रवासी वेळेत खाली उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान,बसला आग नेमकी कशामुळे लागली,याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील 'या' भागात सुरु होता गॅसचा काळाबाजार, पुरवठा विभागाने गोडाऊनवर धाड टाकली अन्..

तांत्रिक बिघाड,शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीचा काही वेळ खोळंबा उडाला होता.  पोलीस आणि प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान,धावत्या बसला अचानक आग कशी लागली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.