जाहिरात

Dhurandhar 2 Review: ल्यारीतच नव्हे, बॉक्स ऑफिसवरही बादशाह बनणार रणवीर सिंग, धुरंधर 2 चा फर्स्ट रिव्ह्यू समोर

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. त्यानंतर आता संपूर्ण देशभरातील चाहत्यांची 'धुरंधर 2' चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच या चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू व्हायरल झाला आहे.

Dhurandhar 2 Review: ल्यारीतच नव्हे, बॉक्स ऑफिसवरही बादशाह बनणार रणवीर सिंग, धुरंधर 2 चा फर्स्ट रिव्ह्यू समोर
Dhurandhar 2 First Review

Ranveer Singh Dhurandhar 2 First Review: रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. त्यानंतर आता संपूर्ण देशभरातील चाहत्यांची 'धुरंधर 2' चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धरुंधर 2 रिलीज होण्यासाठी फक्त 6 दिवस बाकी आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. धरुंधर 2 म्हणजेच 'धरुंधर द रिवेंज' 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे.

अशातच मेकर्सनेही नुकतच थरारक ट्रेलरही रिलीज केला आहे. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर धुरंधर 2 चा फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. ज्यामध्ये धुरंधर 2 ची तुलना प्रभास आणि एसएस राजामौली यांच्या बाहुबली 2 चित्रपटाशी केली गेली आहे. त्यानंतर चाहत्यांनीही जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. धुरंधर 2 ची तुलना करू नका, असंही काही यूजर्सने म्हटलं आहे.

नक्की वाचा >>Pune News: पुण्यातील 'या' भागात सुरु होता गॅसचा काळाबाजार, पुरवठा विभागाने गोडाऊनवर धाड टाकली अन्..

"चित्रपट पाहिल्यानंतर मी तर निशब्द"

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये धुरंधर 2 चित्रपटाला 5 स्टार देत लिहिलियं की,#DhurandharTheRevenge या घडीची #Baahubali2 आहे. सेन्सॉर बोर्डमध्ये हा जबरदस्त चित्रपट पाहिल्यानंतर मी तर निशब्द आहे.या पोस्टवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. धुरंधर 2 चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता.

नक्की वाचा >> Hingoli News : एका महिन्यात 5 वेळा मारहाण? जावयाचा झाला मृत्यू, सासू-सासरे,मेव्हणा अन् पत्नीने पुढं जे केलं..

यामध्ये रेहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीची कमान हमजा अली मजारीच्या हातात आली आहे आणि तो तिथला बादशाहा बनला आहे.पण त्याच्या रस्त्यात मेजर इक्बाल आणि अस्लम चौधरी आहे. आता त्यांचं पुढे काय होतं? याचं रहस्य 19 मार्चला उलगडणार आहे. धुरंधर 2 मध्ये रणवीर सिंग,संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जून आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.दरम्यान, चित्रपटाची एडवान्स बुकिंगने 60 कोटींपर्यंतचं कलेक्शन केलं आहे.यामुळे पहल्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींची ओपनिंग करू शकतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com