Pune News : पुण्यातील 'या' नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील, राजकीय वर्तुळात खळबळ

भोर नगरपालिकेत प्रथमच अभूतपूर्व प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची कार्यालये सील करण्यात आली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Bhor Nagarpalika Offices Sealed
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Bhor Nagarpalika News Today : भोर नगरपालिकेत प्रथमच अभूतपूर्व प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची कार्यालये सील करण्यात आली आहेत.कार्यालयांमध्ये फर्निचरची कामे विनापरवानगी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी ही कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार,नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयात आवश्यक प्रशासकीय मंजुरी न घेता फर्निचरची कामे करण्यात आल्याची तक्रार नगरपालिकेकडे करण्यात आली होती.

मुख्याधिकारी गजानन शिंदे यांचे कार्यालये सील करण्याचे आदेश 

या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दोन्ही कार्यालये सील करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंगही चढला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुरंदरच्या जेजुरीत मन सुन्न करणारी घटना! सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसताच अख्ख कुटुंब हादरलं

कार्यालये सील करण्याची ही पहिलीच घटना

भोर नगरपालिकेच्या इतिहासात नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची कार्यालये सील करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.या निर्णयामुळे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष तसेच संबंधित नगरसेवकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान,या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून विनापरवानगी करण्यात आलेल्या कामांबाबत संबंधितांवर काय कारवाई होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.