Pune News: कुंडमळ्याची दुर्घटना लेटलतिफीमुळे? मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी काम रखडवले?

वर्क ऑर्डरवरचा बाकीचा मजकूर प्रिंटेड, पण तारीख पेनाने का? संपुर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यात टेंडरची ॲार्डर on line नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी

कुंडमळ्याची दुर्घटना लेटलतिफीमुळे झाली? मर्जीतल्या ठेकेदाराला कंत्राटासाठी विलंब झाला? कुंडमळा पुलाची वर्क ऑर्डर पेनाने का लिहिली? काय म्हणते कुंडमळ्याची फाईल? कुंडमळ्यात बुडालेल्या लोकांचा अपघात झाला नाही तर कुंडमळ्यात जीव गमावलेल्यांची हत्याच झाली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ एका पत्रामुळे आली आहे. हे पत्र आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि त्यावर कार्यारंभाचे आदेश देण्यात आले आहेत. हे काम कोणतं आहे? तर जो पूल कोसळला त्याचं. त्याच पुलाला पर्यायी आणि वाहतूक योग्य पूल बांधण्याची. त्यासाठी 8 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. संगमनेरच्या जे. डी. दिघे अँड सन्स या कंपनीला कंत्राटही देण्यात आलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पण ही वर्क ऑर्डर पाच दिवसांपूर्वीची निघावी? हा निव्वळ योगायोग आहे? की आणखी काही? हा प्रश्न विचारण्याचं कारण या वर्क ऑर्डरमध्ये पेनाने लिहिलेली तारीख.आता या पुलाची फाईल कशी रखडत गेली.का रखडत गेली आणि कुणी रखडवली त्याचा प्रवासही डोक्यात तिडीक बसवणारा आहे. दोन वर्षांपूर्वी माजी आमदार बाळा भेगडे यांनी नव्या पुलाची मागणी केली. 4 जुलै 2024 रोजी पर्यायी पुलाची वर्क ऑर्डर पास केली. 11 जुलै 2024 रोजी काम मंजूर झाल्याचं बाळा भेगडेंना कळवलं. या कामासाठी 8 कोटी रुपये मंजूरही झाले. तातडीने काम सुरु होणं अपेक्षित होतं. पण चार महिने कोणतेही काम सुरु झाले नाही.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेची आचारसंहिता.पण टेंडर पास झालेलं असताना आचारसंहिता लागू होत नाही
तरीही कोणतेही काम सुरु झाले नाही. 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला. डिसेंबर महिन्यात नवे सरकार स्थापन
झाले. पण त्यानंतरही पुढचे सहा महिने काम सुरु झाले नाही. 15 जून रोजी अखेर पर्यटकांनी भरलेला पूल कोसळला आणि 16 जून रोजी 10 जूनची तारीख असलेली वर्क ऑर्डर समोर आली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur News: जुगाराचं व्यसन, मोठ्या पगाराची नोकरी सोडली, इंजिनियर तरुणाने जे केलं ते...

त्यामुळे प्रश्न असा आहे, की मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी पुलाचे काम रखडवले गेले का? एकदा वर्क ऑर्डर मंजूर झालेली असताना पुन्हा पुन्हा वर्क ऑर्डर का काढली गेली? पूल धोकादायक बनत असताना, ही दिरंगाई जीवघेणी ठरण्याची शंका आली नाही का? पुलाचं काम कारण नसताना रखडवणं हा पर्यटकांच्या जीवाशी खेळ नाही का? दुर्घटनेनंतर समोर आलेली वर्क ऑर्डर केवळ पाच दिवस आधीचीच कशी? नेते, अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच आधीच्या तारखेनं वर्क ऑर्डर काढली? हे प्रश्न निर्माण होत आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kolhapur News: विषय हार्ड!'नांदायला येते पण...', बायकोच्या मागणीने नवरा हादरला

वर्क ऑर्डरवरचा बाकीचा मजकूर प्रिंटेड, पण तारीख पेनाने का? संपुर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यात टेंडरची ॲार्डर ऑनलाईन नाही. बाकीच्या जिल्ह्यात मात्र सर्वत्र ऑनलाईन टेंडर ऑर्डर आहेत. बाकी जिल्ह्यात maha pwd portal वर work order ऑनलाईन निघते. मग प्रश्न असा आहे, की आपल्याकडे जीव गेल्याशिवाय दुरुस्तींच्या कामाला सुरुवात होऊच शकत नाही का? प्रकल्पाला बळी दिल्याशिवाय कामाला वेग येऊच शकत नाही का? प्रश्न हा पण आहे. की जर पूल धोकादायक होता. जर पूल गंजलेला होता. जर पूल तुटलेला होता. जर पुलाच्या बांधकामाची वर्क ऑर्डर निघाली होती. तर तो पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी बंद का केला नाही? चलता है... चलने दो... या अॅटिड्यूटमुळे किंवा त्याला काय होतंय. या बेफिकीरीमुळे आणि आपल्याच मर्जीतल्या लोकांना कंत्राट देण्याच्या हावरेपणामुळे चार निष्पापांचा बळी गेलाय. नव्हे यंत्रणेनं या चार जणांचा खून केलाय.