जाहिरात

Nagpur News: जुगाराचं व्यसन, मोठ्या पगाराची नोकरी सोडली, इंजिनियर तरुणाने जे केलं ते...

2023 मध्ये त्याने चांगल्या पगाराची नोकरी देखील सोडली.

Nagpur News: जुगाराचं व्यसन, मोठ्या पगाराची नोकरी सोडली, इंजिनियर तरुणाने जे केलं ते...
नागपूर:

संजय तिवारी 

जुगाराचे व्यसन किती घातक ठरू शकते त्याचे एक ताजे उदाहरण नागपुरात समोर आले आहे. MTech इंजिनियर असलेल्या एका हुशार तरुणाला हा नादा लागला. त्यानंतर त्याचे आयुष्यच उद्धवस्त झाले. जुगाराचे व्यसन जडले असल्याने, ते भागवण्यासाठी तो चोर बनला. याच MTech इंजिनिअर चोरट्याला नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. तो चोर का झाले हे जाणून घेतल्यानंतर पोलिसही गोंधळून गेले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आशिष रेड्डीमल्ला असे आरोपी इंजिनिअर तरूणाचे नाव आहे. तो चंद्रपूर मधील रयतवारी कॉलनीचा रहिवासी आहे. त्याचे वडील सुद्धा उच्चशिक्षित असल्याची माहिती आहे. त्याने एमटेकपर्यंत शिक्षण घेतलं. मिहानमध्ये तो एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत होता. मात्र जुगार खेळण्याची त्याला लत लागली. त्यातून तो कर्जबाजारी झाला. त्यानंतर तो चक्क चोरी करायला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी करून कर्ज फिटेल असं त्याला वाटत होतं. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

2023 मध्ये त्याने चांगल्या पगाराची नोकरी देखील सोडली. त्यानंतर चोऱ्या करायला लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो सध्या नागपुरात राहत होता. तसेच नागपुरात चोऱ्या करत होता. त्याला चंद्रपुरातून अटक करण्यात आली आहे. आता पर्यंत आशिषने पाच ठिकाणी घरफोडी केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. नागपुरातील छत्रपती चौकच्या आसपास असलेल्या परिसरात तो चोऱ्या करून जुगार खेळायचा. त्याच्याकडून 2 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai: धक्कादायक! लोकसंख्या 3 लाख, पण एकही पेट्रोलपंप नाही, घराघरात विकलं जातय पेट्रोल डिझेल

यात परदेशी चलन सुद्धा मिळून आले आहे. या आधी सुद्धा त्याला दोन वेळा पोलिसांनी अटक केली  होती. बंद घर दिल्यास हा तिथे चोरी करायचा. या प्रकरणी पोलिसांनी जवळपास 120 सीसीटीव्ही तपासले. त्यात हा आढळून आला. नंतर पोलिसानी चेहऱ्याची शहानिशा करून त्याला अटक केली. त्यानंतर त्याने पोलिसांनी आपली सर्व कथा सांगितली. पोलिस ही त्याची कारणं ऐकून आवाक झाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com