'मला निर्वस्त्र बाई बघायचीये'; 15 वर्षांच्या मुलाची मागणी; बुधवार पेठेतील महिलेचा धक्कादायक अनुभव

बुधवार पेठेतील महिलेने १५ वर्षाच्या मुलाची कॉलर पकडली, त्याला रिक्षात बसवलं अन् काही वेळाने ती ढसाढसा रडू लागली.

जाहिरात
Read Time: 3 mins
AI Image

Pune Budhwar Peth Story : पुण्यातील बुधवार पेठेत अनेक भयंकर अन् धक्का देणाऱ्या घटना दडलेल्या आहे. येथील छोट्या खोल्यांमधील काळ्या कुट्ट अंधारात अनेक जीव उद्ध्वस्त होतात, तसे अनेक नात्यांचे अंकुरही फुलतात. वेश्यावस्तीतील महिलेचं जीणं किती भयंकर असू शकतं याचा आपण विचारही करू शकत नाही. तिला येणारा अनुभव केवळ वास्तव दर्शविणारा नसतो तर समाजातील सद्यपरिस्थिती दाखविताना डोळ्यात अंजन घालणाराही असतो.  

वेश्यावस्तीतील असाच धक्कादायक प्रसंग 'आरपार' या युट्यूब चॅनलवर 'सहेली' संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांनी मांडला आहे.  

 
वेश्यावस्तीतील एक महिला तावातावाने इमारतीच्या खाली उतरली. तिने शाळेचा गणवेश घातलेल्या त्या 15 वर्षाच्या मुलाची कॉलर पकडली अन् त्याला दमदाटी दिली. पुन्हा इथं दिसलास तर कंबरडं मोडेन असं म्हणत वेश्या महिलेनेच रिक्षा चालकाला पैसे दिले आणि मुलाला त्याच्या घरी सोडून येण्यास सांगितलं. याशिवाय मुलाला कुठून आणलं हे कुणाला सांगू नको असंही तिने रिक्षाचालकाला बजावलं. यानंतर महिलेच्या अश्रूचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. तोपर्यंत नेमकं काय घडलंय हे कुणालाच कळत नव्हतं. मात्र त्यानंतर महिलेने जे काही सांगितलं त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 


'मला कपडे न घातलेली बाई पाहायची आहे'

शाळेचा गणवेश घातलेला, दप्तर घेतलेला मुलगा बुधवार पेठेत आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तेजस्वी सेवेकरी यांनी त्याला हटकलं. 'तू कशाला आलाय', असा प्रश्न करताच तो म्हणाला, 'मला कपडे न घातलेली बाई पाहायची होती. म्हणून मी माझे बसचे आणि खाऊचे पैसे वाचवले आणि येथे आलो. मी पुढे काही केलं नाही, ते सर्व मी लग्नानंतर करणार आहे. पण मला निर्वस्त्र बाई पाहायची होती म्हणून इथं आलो'. यानंतर हा मुलगा ज्या महिलेकडे गेला होता तिनं जे सांगितलं ते ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी उभं राहिलं. महिलेने स्वत:च्या पैशाने त्या मुलाला रिक्षात बसवून घरी पाठवलं. पुन्हा कधी इथं येऊ नको असंही बजावलं. मात्र मुलासोबतच जे करावं लागलं त्यामुळे महिला प्रचंड दुखावली होती, कारण त्या महिलेचा मुलगाही ग्राहक बनून आलेल्या या मुलाच्या वयाचा होता. इथं अडकला तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल याची तिला भीती होती. या विचारानेच तिच्या भावनेचा बांध फुटला. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : 'वेश्यावस्तीत येणारा प्रत्येक पुरुष वाईट नसतो'; बुधवार पेठेतील अशी बाजू ज्यापासून आपण सारे अनभिज्ञ


लैंगिक शिक्षणावर कोणीच बोलत नाही...

यावेळी सेवेकरी यांनी लैंगिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्याबाबत खंत व्यक्त केली. आजही लैंगिकतेबद्दल बोललं जात नाही. जर त्या मुलाला शाळेत शास्त्रीयदृष्टया याबाबत माहिती दिली असती तर कदाचित त्याला याविषयी आकर्षण मिटलं असतं असंही सेवेकरी यावेळी म्हणाल्या. या घटनेकडे अनेक पैलूंनी पाहता येईल. आजही आपण लैंगिक शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर खुलेपणाने बोलत नसल्याची खंत सेवेकरी यांनी व्यक्त केली.